सोलापूरकरांच्या हाती पुण्याच्या रिक्षांचं हॅन्डल !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2018 10:59 AM2018-08-29T10:59:24+5:302018-08-29T11:01:52+5:30

जगण्यासाठी सोलापूर सोडले : सोलापुरी रिक्षाचालकांची छाप

Pune's Rakhschal Handle in Solapur! | सोलापूरकरांच्या हाती पुण्याच्या रिक्षांचं हॅन्डल !

सोलापूरकरांच्या हाती पुण्याच्या रिक्षांचं हॅन्डल !

Next
ठळक मुद्दे आॅटो रिक्षा रोजच्या रोजीरोटीचा एक भाग म्हणून समोर येऊ पाहत आहेसोलापूरचे रिक्षावाले काका आता पुण्यात रिक्षा अंकल म्हणून ओळखू लागले़रोजगार वाढला तरच पुण्यात येणारा सोलापूरकरांचा लोंढा कमी होणार

आप्पासाहेब पाटील 

सोलापूर : आॅटो रिक्षा आज वाहनप्रकार वाहन उद्योगाचा आणि अनेक भारतीयांचा एक अविभाज्य भाग आहे. काही लोकांकरिता एक प्रवासाचे साधन म्हणून तर काहींसाठी रोजच्या रोजीरोटीचा एक भाग म्हणून समोर येऊ पाहत आहे

सोलापूर शहरातील मर्यादित कार्यक्षेत्र, केवळ २० ते २५ किलोमीटरपर्यंतचे अंतऱ़़ कुठेही बसा़... कुठेही उतरा फक्त २० रुपयेच हातात.. शिवाय पोलिसांची कटकट़.. त्यातूनच रिक्षामध्ये विद्यार्थी वाहतूक सुरू झाली़... अन् आम्ही रिक्षावाल्याचे काका झालो... मात्र दिवसेंदिवस वाढत्या महागाईचा त्रास काही केल्या कमी होईना. त्यामुळे जास्तीच्या कमाईसाठी पुणे गाठलं... तेथेही विद्यार्थी वाहतूक सुरू केली अन् सोलापूरचे रिक्षावाले काका आता पुण्यात रिक्षा अंकल म्हणून ओळखू लागले़.

मूळ मोहोळ तालुक्यातील व सध्या पुण्यात स्थायिक झालेले रिक्षाचालक प्रदीप गोटे यांनी सांगितले की, पुणे शहर विस्ताराने मोठे आहे़ याठिकाणी आयटी कंपन्यांसोबत रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात असल्याने कामगारांची संख्यादेखील मोठी आहे़ शिवाय पुण्याची लोकसंख्या मोठी असल्याने येथे रिक्षा व्यवसाय जोमात आहे़ सोलापूरपेक्षा पुण्यात इंधनही स्वस्त आहे. सोलापुरात फक्त शिवाजी चौक, रेल्वे स्टेशन, मार्केट यार्ड, विडी घरकूल, सात रस्ता एवढ्याच परिसरात रिक्षा व्यवसाय आहे़ शिवाय याही मार्गावर ठरलेल्याप्रमाणे भाडे देण्यास सोलापूरकर टाळाटाळ करतात़

पती-पत्नी विद्यार्थी रिक्षाचालक
 - तुळशी (ता. माढा) येथील सदाशिव काशिनाथ शिंदे हा पदवीधर तरुण. संस्थेत शिक्षक होता. पण संस्थाचालकांनी वाºयावर सोडल्याने विद्यार्थी रिक्षा व्यवसाय सुरू केला. मुलांची संख्या वाढल्याने पुढे मारुतीची ओमनी कार घेतली. आणखी मुले वाढल्याने टाटा मॅजिक घेतली. पती-पत्नी दोघेही विद्यार्थी वाहतूक करतात. दरमहा ५० हजारांपर्यंत कमाई आहे. यांची एक मुलगी सध्या एमबीबीएस करतेय. पुण्यात घरजागा घेऊन स्थिरस्थावर झालाय. 

कामधंद्याच्या शोधात २००८ साली मी पुण्यातील काळेवाडीत राहण्यास आलो़ सुरुवातीपासूनच रिक्षा चालविण्याचा व्यवसाय सुरू केला़ याठिकाणी रिक्षा व्यवसायाला चांगले दिवस आहेत. त्यामुळे महिन्याकाठी २० ते २५ हजार रुपये उत्पन्न कमवितो़ सोलापूर जिल्ह्यात शेती आहे मात्र पाणी नाही, सातत्याने दुष्काळाशी करावा लागणारा सामना, बेरोजगाराचे प्रमाण, नोकºया नाहीत, यामुळे सोलापुरातील बहुतांश तरुण, युवक पुण्यात स्थायिक झाले आहेत़ रोजगार वाढला तरच पुण्यात येणारा सोलापूरकरांचा लोंढा कमी होणार आहे़
- शहाजी लोंढे,
रा़ कोंढेज, ता़ करमाळा, जि़ सोलापूर

मी, २००४ साली नोकरीच्या निमित्ताने पुण्यात आलो़ सुरुवातीला ड्रायव्हिंगचा व्यवसाय केला़ नंतर २०११ साली स्वत:ची रिक्षा घेऊन रिक्षा चालविण्याचा व्यवसाय केला़ आज या व्यवसायाच्या माध्यमातून माझा संसार व्यवस्थित सुरू आहे़ सध्या औंढ येथे राहण्यास आहे़ सोलापुरात बेरोजगाराचे प्रमाण खूप आहे़ येथे राजकीय दबावामुळे मोठमोठे उद्योग येत नाहीत़ ही परिस्थिती बदलली पाहिजे तरच पुणेरी सोलापूरकर पुन्हा सोलापुरात येतील, नाहीतर परिस्थिती आहे तशीच राहील़
- शिवाजी बलभीम मस्तुद,
रिक्षाचालक, पुणेरी सोलापूरकर

Web Title: Pune's Rakhschal Handle in Solapur!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.