सोलापूर जिल्हा बँकेच्या चार कर्मचाºयांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 11:39 AM2018-04-24T11:39:07+5:302018-04-24T11:39:07+5:30

कार्यकारी समिती सभा संपन्न, १९ विषयांना बहुमताने मिळाली मंजुरी

Action on four employees of Solapur District Bank | सोलापूर जिल्हा बँकेच्या चार कर्मचाºयांवर कारवाई

सोलापूर जिल्हा बँकेच्या चार कर्मचाºयांवर कारवाई

Next
ठळक मुद्देजिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कार्यकारी समितीची सभा राजन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालीएस. बी. म्हमाणे या वाहनचालकाला गैरवर्तनामुळे निलंबित करण्यात आले

सोलापूर: गैरवर्तन करणाºया एकाचे निलंबन, एकाची बडतर्फी, एकाची खातेनिहाय चौकशी तर एकाचा राजीनामा मंजूर करण्याचा निर्णय सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कार्यकारी समितीने घेतला. समितीने १९ विषयांना मंजुरी दिली.

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कार्यकारी समितीची सभा बँकेचे अध्यक्ष राजन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सभेला संचालक आमदार बबनराव शिंदे, संचालिका सुनंदा बाबर, सुभाष शेळके व भारत सुतकर उपस्थित होते. करमाळा तालुक्यातील वांगी-३ शाखेतील लिपिक डी. बी. तांबवे यांनी दिलेला राजीनामा मंजूर करण्यात आला.

वाहनचालक एस. बी. म्हमाणे या वाहनचालकाला गैरवर्तनामुळे निलंबित करण्यात आले असून, कार्यकारी समितीने त्यास मान्यता दिली. सांगोला शाखेतील शिपाई एस. आर. वाईकर याची खातेनिहाय चौकशी करण्यात आली असून, त्यात दोषी आढळल्याने त्याच्यावर बडतर्फीची कारवाई करण्याचा विषय कार्यकारी समितीसमोर ठेवला होता. त्यास मान्यता देण्यात आली. शेती कर्ज विभागातील अधिकारी एम. व्ही. रेडे यांनी पंढरपूर शाखेत असताना हेड शाखेतून पाठविलेले १८ कोटी रुपये स्टेट  बँकेतून काढले. परंतु ते मुख्यालयाला कळविले नाही. ६० दिवसांचा ८ टक्के व्याजाचा भुर्दंड बँकेला सोसावा लागला. यामुळे रेडे यांची खातेनिहाय चौकशी झाली असून, त्यांच्यावर कारवाईचा प्रस्ताव आहे. 

३५ लाख भरणारे न्यायालयात
- रोपळे (प) शाखेतील बडतर्फ कर्मचारी एस. ए. कदम यांनी अपहाराची ३५ लाख ८६ हजार ८०० रुपये इतकी रक्कम भरणा केली असून, त्यांच्याकडे व्याजाची १८ लाख एक हजार ११६ रुपये येणेबाकी आहे. कदम हे मागील तीन महिन्यांपासून कामावरही नाहीत. बडतर्फीला कदम याशिवाय बडतर्फ शिपाई पी. डी. सातपुते यांनीही कामगार न्यायालयात बँकेविरोधात दाद मागितली असल्याने हा विषय कार्यकारी समितीसमोर आला होता.

Web Title: Action on four employees of Solapur District Bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.