सावधान! ती पुन्हा आलीय, सगळीकडे तिचीच चर्चा!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2019 03:38 PM2019-07-27T15:38:23+5:302019-07-27T15:38:36+5:30

सोशल मीडियावर अनेक महारथी पाहायला मिळतात. पण तिची बात काही औरच... कोण आहे ती आणि का होत आहेत लोकं सावध?

Dhinchak poojas new song naach ke pagal can harm your ears beware | सावधान! ती पुन्हा आलीय, सगळीकडे तिचीच चर्चा!

सावधान! ती पुन्हा आलीय, सगळीकडे तिचीच चर्चा!

Next

ढिंचॅक पूजा आठवतेय का? तेही बरोबरच आहे म्हणा, तिला कोण आणी कसं विसरेल? 'सेल्फी मैंने ले ली आज' हे गाणं व्हायरल तर झालं होतं. एक वेळ होती, ढिंचॅक पूजाची गाणी ऐकून सोशल मीडियावर लोकांना विट आणला होता. गाणी ऐकल्यानंतर अनेकांना डोकेदुखीचाही त्रास झाला असल्याचे सांगितलं जातं होतं. सोशल मीडियावर ढिंचॅक पूजासारखे अनेक महारथी पाहायला मिळतात. पण ढिंचॅक पूजाची बात काही औरच...

'दिलों का स्कूटर' , 'स्वॅग वाली टोपी' अशी अनेक गाणी सोशल मीडियावर दुमाकूळ घालत होती. पण आता तुम्हाला सावध होण्याची गरज आहे. कारण आता तुमची डोकेदुखी पुन्हा सुरू होणार आहे. अहो का काय विचारताय? ढिंचॅक पूजा परत आली आहे. तेही नव्या गाण्यासोबत. 'नाच के पागल' हे गाणं एकदिवस अगोदर यूट्यूबवर अपलोड करण्यात आलं आहे. खरचं जर तुमच्यात हिम्मत असेल तरच हे गाणं ऐका... नाहीतर डोक फक्त दुखणार नाही तर डोकं फुटायची वेळ येईल.
 
पाहा ढिंचॅक पूजाचं नवीन गाणं 

ढिंचॅकचं हे गाणं 2 मिनिटं 3 सेकंदांचं आहे. पण हे ऐकल्यानंतर आणि पाहिल्यानंतर तुम्ही 2 ते 3 दिवसांसाठी नक्कीच डिप्रेशनमध्ये जाल. 

गाण्यापेक्षाही जास्त भन्नाट लोकांचे कमेन्ट्स

लिरिक्स, प्रोडक्शन क्वालिटी, साउंड सर्व काही पाहिल्यावर तुम्ही खरचं कदाचित 4 ते 5 दिवसांसाठी यूट्यूब पाहणार नाही. ढिंचॅक पूजाने बीग बॉस हिंदीमध्येही दिसून आली होती. तिचं स्वचःचं यूट्यूब चॅनेल असून ती सोशल मीडियावर नवनवीन व्हिडीओ शेअर करत असते. 

Web Title: Dhinchak poojas new song naach ke pagal can harm your ears beware

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.