पालकमंत्र्यांनी ५० कोटी आणले कोठून

By admin | Published: January 13, 2016 09:33 PM2016-01-13T21:33:18+5:302016-01-13T21:33:18+5:30

नीलेश राणे : सांगेलीतील काँगे्रस मेळाव्यात सरकारवर चौफेर टीका

Where did the Guardian Minister pay 50 crores? | पालकमंत्र्यांनी ५० कोटी आणले कोठून

पालकमंत्र्यांनी ५० कोटी आणले कोठून

Next

 सावंतवाडी : भारतीय जवानांना पाकिस्तान गोळ्या घालत असताना पाकिस्तानला केक भरवणारे पंतप्रधान, सैन्यात दहशतवादी सापडल्यानंतर ते कोठून आले हे समजले नाही म्हणणारे संरक्षणमंत्री तर जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना बांगड्या भरण्याचा इशारा त्यांच्याच मित्रपक्षाने दिला आहे. यामुळे या सरकारचा विकास ठप्प झाला आहे. तसेच राज्य सरकारवर कर्ज असतानाही पालकमंत्र्यांनी ५० कोटी रुपये कोठून आणले, असा टोला माजी खासदार नीलेश राणे यांनी पालकमंत्र्यांना लगावला.
सांगेली जिल्हा परिषद मतदारसंघ कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते.
यावेळी काँग्रेस जिल्हाध्यक्ष सतीश सावंत, डॉ. जयेंद्र परुळेकर, काँग्रेस तालुकाध्यक्ष संजू परब, संदीप कुडतरकर, जिल्हा सरचिटणीस मंदार नार्वेकर, पंचायत समिती सभापती प्रमोद सावंत, शहराध्यक्ष सुधीर आडिवरेकर, आनंद शिरवलकर, अंकुश जाधव, जिल्हा परिषद सदस्य पंढरीनाथ राऊळ, प्रमोद कामत, गुरुनाथ पेडणेकर, रवी मडगावकर, प्रेमानंद देसाई, आत्माराम पालयेकर, गजानन गावडे, अभय किनळोसकर, सत्यवान बांदेकर, दिलीप भालेकर, जॅकी डिसोजा, गीता परब आदी उपस्थित होते.
यावेळी नीलेश राणे म्हणाले, ग्राम व वित्त विकास ही दोन्ही पदे जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांकडे असताना ४० टक्के निधी विदर्भाकडे जात आहे. मार्चमध्ये मंजूर झालेला निधी अद्यापही खर्च होत नाही. या मार्चमध्ये हा निधी पुन्हा परत जाण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात घरपट्टी वाढविली आहे. राज्य सरकारवर ३ लाख कोटींचे कर्ज असतानाही पालकमंत्र्यांनी ५० कोटी कुठून आणले, असा टोला राणे यांनी लगावला.
रेल्वेमंत्र्यांनाही रेल्वेची कामे पूर्ण करता येत नसल्याने रेल्वे बजेटमधील बारा हजार कोटी कमी झाले आहेत. मंत्र्यांना मंजूर झालेली कामेही करून घेता येत नाहीत, हे दुर्दैव आहे. संरक्षणमंत्री म्हणताहेत, दहशतवादी आत कसे घुसले ते कळलेच नाही. मग घुसले तेव्हा काय केले? पंतप्रधान याच दहशतवाद्यांना संरक्षण देण्याचे काम करत आहेत. शेतकऱ्यांना संरक्षण देण्यापेक्षा दहशतवाद्यांना संरक्षण देणे पंतप्रधानांना जास्त गरजेचे वाटत आहे, असेही राणे यांनी सांगितले.
सावंतवाडी नगरपरिषदेत पालकमंत्री दीपक केसरकर कुणाचे, नगराध्यक्ष कुणाचे, नगरसेवक कुणाचे हेच कळत नाही. येत्या निवडणुकीत सावंतवाडी नगरपरिषदेवर काँगे्रसचीच सत्ता बसेल, असा विश्वासही राणे यांनी व्यक्त केला. या मेळाव्याला जिल्हा परिषद मतदारसंघातील सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.
(वार्ताहर)

ठेकेदारांवर आत्महत्येची वेळ : सतीश सावंत
यावेळी सतीश सावंत म्हणाले, पंतप्रधान सडक योजना राबवून ठेकेदारांवर आत्महत्येची वेळ खासदारांनी आणली आहे. केंद्र सरकारचा त्यांना अभ्यास नसल्यामुळे कुठल्याच योजना प्रभावीपणे राबविता येत नाहीत. यामुळे महिलांसाठी जिल्हा बँकेमार्फत विविध योजना राबवू, असे सावंत म्हणाले. सत्तेसाठीच दीपक केसरकर यांनी पक्ष बदलले आहेत. मंत्रिमंडळातही त्यांना कोण विचारत नाही. तर जिल्ह्यात मित्रपक्षच पालकमंत्र्यांना बांगड्या भरायला सांगतात. ही बाब दुर्दैवी आहे, असे डॉ. परूळेकर यांनी सांगितले.

तालुकाध्यक्षपदाची अधिकृत जबाबदारी मिळाल्यानंतर सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी अनेक आंदोलने सुरू केली. यामध्ये डेगवे येथील भातखरेदी आंदोलन, विद्युत प्रवाह सुरळीत करण्यासाठी, आरोंदा जेटी, आयटीआय याठिकाणी जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी आंदोलने केली. यापुढेही तालुक्यातील जनतेच्या विकासासाठी प्रयत्नशील राहू व जिल्हा परिषद, पंचायत समिती व येत्या नगरपरिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसचेच वर्चस्व राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
- संजू परब
 

Web Title: Where did the Guardian Minister pay 50 crores?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.