पर्यटक व नागरिकांच्या स्वागताला कणकवलीच्या रस्त्यावरच मोकाट जनावर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2018 02:10 PM2018-11-22T14:10:19+5:302018-11-22T14:15:58+5:30

शहरातील कचराकुंड्या योग्य पद्धतीने ठेवण्यात न आल्याने यातील कचरा जागोजागी पसरत आहे. त्यामुळे मोकाट जनावरे अशा कचराकुंड्यांमध्ये टाकल्या जाणाºया टाकाऊ पदार्थांवर ताव मारताना दिसत आहेत.

Welcome to tourists and citizens, on the road to Kankavali | पर्यटक व नागरिकांच्या स्वागताला कणकवलीच्या रस्त्यावरच मोकाट जनावर...

पर्यटक व नागरिकांच्या स्वागताला कणकवलीच्या रस्त्यावरच मोकाट जनावर...

Next
ठळक मुद्देस्वच्छ आणि सुंदर कणकवलीच्या नावाखाली खर्च झाला असतानाही प्रशासन मात्र  सुशेगाद असल्याचे पहावयास मिळत  आहे.यावर नगरपंचायत प्रशासन कारवाई करीत  नसल्याने शेतकरी आपल्या जनावरांना सोडून देतात

कणकवली : शहरातील कचराकुंड्या योग्य पद्धतीने ठेवण्यात न आल्याने यातील कचरा जागोजागी पसरत आहे. त्यामुळे मोकाट जनावरे अशा कचराकुंड्यांमध्ये टाकल्या जाणाºया टाकाऊ पदार्थांवर ताव मारताना दिसत आहेत. रेल्वे स्थानकाच्या लगत असलेल्या कचराकुंडीच्या ठिकाणी  नेहमीच हे चित्र पहायला मिळते.

स्वच्छ आणि सुंदर कणकवलीच्या नावाखाली खर्च झाला असतानाही प्रशासन मात्र  सुशेगाद असल्याचे पहावयास मिळत  आहे. मोकाट जनावरांवरील कारवाई  अधूनमधून केली जाते. 

रेल्वे स्थानकाच्या पूर्वेला शिवशक्ती सभागृहाशेजारी एकच कचराकुंडी आहे. या कचराकुंडीच्या परिसरात जनावरांचा नेहमीच वावर असतो. कचराकुंडी बाजूला करावी किंवा कचराकुंडीचे योग्य व्यवस्थापन करावे, जेणेकरून जनावरांना कचरा कुंडीतील कचरा बाहेर काढता येणार नाही, अशी मागणी होत आहे. भटके कुत्रे याच परिसरात ठाण मांडून  असतात. त्यांची संख्या कमी झाली असली तरी मोकाट जनावरे मात्र वावरताना दिसतात. 

यावर नगरपंचायत प्रशासन कारवाई करीत  नसल्याने शेतकरी आपल्या जनावरांना सोडून देतात.  रेल्वे स्थानक परिसरात मोकाट जनावरांचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

स्वच्छता अभियान राबविताना कणकवली शहरात काही नागरिकांना नगरपंचायतीच्यावतीने घरातील सुका तसेच ओला कचरा गोळा करण्यासाठी डस्टबीन वाटण्यात आली आहेत. मात्र, अनेक नागरिकांना डस्टबीन मिळालेली नाहीत. त्यामुळे त्यांना कचरा गोळा करताना अडचण निर्माण होत आहे. कचरा गोळा करण्यासाठी येणारी घंटागाडी अथवा ट्रॅक्टर दिवसातून एकदाच येत असतो. नोकरीनिमित्त दिवसभर घराबाहेर असणाºया नागरिकांना या गाड्या गेल्यानंतर आपल्याजवळील कचरा कुठे टाकायचा हा प्रश्न सतावत आहे.

शहरात कचºयाची समस्या

कणकवली शहरातील कचºयाची समस्या सुटलेली नाही. जागोजागी फेकलेल्या प्लास्टिकच्या पिशव्या, प्लास्टिक बाटल्या, खाऊची रिकामी पाकिटे  ठिकठिकाणी पहायला मिळतात. नगरपंचायतीने योग्य पद्धतीने कचरा व्यवस्थापन केलेले नाही. दिवसभरातून एकदाच कचरा उचलला जातो. त्यामुळे साचलेला कचरा फेकून देण्यासाठी नागरिकांची गैरसोय होते. 

 

 

Web Title: Welcome to tourists and citizens, on the road to Kankavali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.