कणकवलीत दुबईच्या धर्तीवर ' वॉटर फॉल'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 05:40 PM2021-04-01T17:40:15+5:302021-04-01T17:42:41+5:30

water park Kankvali Sindhudurg- प्रादेशिक पर्यटन योजनेतून कणकवली शहरात पर्यटनाच्या दृष्टीने सुविधा निर्माण होण्यासाठी बारमाही सुरू असणारा ( वॉटर फॉल ) धबधब्याचा प्रकल्प लवकरच सुरू करण्यात येणार आहे . कणकवली शहराच्या सौंदर्यात भर टाकण्यासाठी नवनवीन उपक्रम आम्ही हाती घेतले आहेत . त्याचाच एक भाग म्हणून सुमारे २.४६ कोटी रुपयांचा निधी या धबधब्याच्या कामासाठी मंजूर झाल्याची माहिती नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली.

'Waterfall' in Kankavali on the lines of Dubai | कणकवलीत दुबईच्या धर्तीवर ' वॉटर फॉल'

कणकवलीत दुबईच्या धर्तीवर ' वॉटर फॉल'

Next
ठळक मुद्दे नगरपंचायतचा नाविन्यपूर्ण उपक्रमसमीर नलावडे , बंडू हर्णे यांची माहिती

सुधीर राणे

कणकवली : प्रादेशिक पर्यटन योजनेतून कणकवली शहरात पर्यटनाच्या दृष्टीने सुविधा निर्माण होण्यासाठी बारमाही सुरू असणारा ( वॉटर फॉल ) धबधब्याचा प्रकल्प लवकरच सुरू करण्यात येणार आहे . कणकवली शहराच्या सौंदर्यात भर टाकण्यासाठी नवनवीन उपक्रम आम्ही हाती घेतले आहेत . त्याचाच एक भाग म्हणून सुमारे २.४६ कोटी रुपयांचा निधी या धबधब्याच्या कामासाठी मंजूर झाल्याची माहिती नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली.

कणकवली नगरपंचायतमध्ये नगराध्यक्ष दालनात गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते . यावेळी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे , आरोग्य सभापती अभिजीत मुसळे , गटनेते संजय कामतेकर , नगरसेवक रवींद्र गायकवाड, शिशिर परुळेकर , माजी नगरसेवक किशोर राणे , महेश सावंत , अजय गांगण आदी उपस्थित होते .

समीर नलावडे म्हणाले , कणकवली हे जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण असतानाही पर्यटक व युवा पिढीसाठी पर्यटनाच्या दृष्टीने येथे कोणतीही सुविधा नव्हती . यासाठीच हा नितेश राणे यांच्या संकल्पनेतून नवीन प्रकल्प राबविण्याचे ठरविण्यात आले . काही महिन्यांपूर्वी शहरात स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स व उद्यानाच्या कामाचा शुभारंभ केल्यानंतर आता हे एक नाविन्यपूर्ण काम हाती घेण्यात येत आहे . जिल्ह्यातील पर्यटक जे आंबोली , सावडाव येथे वर्षा पर्यटनासाठी पावसाळ्यात जातात त्यांना बारमाही कणकवलीत धबधब्याचा आनंद लुटता येणार आहे. या कामाला तांत्रिक मान्यता मिळाली असून , लवकरच निविदा प्रक्रिया होईल असेही त्यांनी यावेळी सांगितले .

बंडू हर्णे म्हणाले , ६ मीटर या धबधब्याची उंची असणार आहे. तर १८ मीटर लांबीचा हा धबधबा असणार आहे . नदीकिनारी जी पूरनियंत्रण रेषा ठरवून देण्यात आली आहे त्यापेक्षाही धबधब्याची जागा उंच करण्यात येणार आहे . त्यामुळे जनतेच्या सुरक्षिततेचीही काळजी घेत हे काम करण्यात येणार आहे . धबधब्याचे जे पाणी पडणार त्यात 'नॅचरल फिलिंग' असणार आहे . तसेच हे पाणी फिल्टर करून क्लोरीन प्लांटमध्ये जाणार आहे . त्यानंतर क्लोरिनायजेशन होत पाण्याचा धबधब्यासाठी वापर केला जाणार आहे .

धबधब्यासाठी पाण्याचा वापर झाला की ते पाणी पुन्हा नदीमध्ये सोडण्यात येईल . तसेच नवीन पाण्याचा भरणा करण्यात येईल . यामुळे पाण्यामुळे कोणताही दुष्परिणाम उद्भवणार नाही . तसेच पाण्याचा दुरुपयोगही होणार नाही . येथे येणाऱ्या पर्यटकांना सुविधा मिळावी म्हणून या ठिकाणी दहा आसनी मोबाईल टॉयलेट व्हॅन ठेवण्यात येणार आहे . तसेच धबधब्याच्या भिंतीना व्हर्टिकल गार्डन करण्यात येणार आहे .

जेणेकरून धबधब्याजवळ आनंद लुटण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना नैसर्गिक वातावरण अनुभवता येणार आहे . धबधब्याजवळ येणाऱ्या लोकांना सुरक्षितता म्हणून नदीच्या काठाच्या बाजूला बॅरिकेट लावण्यात येणार आहेत . आमदार नितेश राणे , नगराध्यक्ष समीर नलावडे व सत्ताधारी नगरसेवक यांच्या संकल्पनेतुन हा प्रकल्प हाती घेण्यात येत असून , किंग ऑफ दुबई मोहम्मद बिन रशिद यांनी पर्यटनाच्या दृष्टीने जी दुबईत संकल्पना राबवली त्याच धर्तीवर हा धबधब्याचा प्रकल्प उभारण्यात येणार असल्याचे बंडू हर्णे यांनी यावेळी सांगितले .

शहर पर्यटनदृष्ट्या विकसीत होण्यासाठी प्रयत्न !

कणकवली शहराच्या दोन बाजूला नद्या आहेत. मात्र, पर्यटनदृष्ट्या शहराचा विकास करायचा झाल्यास नैसर्गिक दृष्ट्या तशी ठिकाणे नाहीत. पण तरीही पर्यटनदृष्ट्या शहर विकसित करण्यासाठी आमचे प्रयत्न असून कृत्रिमरीत्या काही धबधब्यासारखे प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. असे यावेळी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी सांगितले.
 

Web Title: 'Waterfall' in Kankavali on the lines of Dubai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.