कंपनीविरोधातील सुनावणी आज

By admin | Published: April 5, 2016 10:37 PM2016-04-05T22:37:21+5:302016-04-06T00:25:29+5:30

आशापुराचा फैसला : न्यायालयाने दिलेला कालावधी संपला

Today's hearing against the company | कंपनीविरोधातील सुनावणी आज

कंपनीविरोधातील सुनावणी आज

Next

दापोली : आशापुरा मायनिंगमुळे प्रदूषण होऊन पर्यावरणाची हानी होत असल्याची तक्रार काही ग्रामस्थांनी दिली होती. त्यामुळे कंपनी तात्पुरती बंद ठेवण्याचे आदेश प्रांताधिकारी जयराम देशपांडे यांनी दिले होते. या निर्णयावर आज सुनावणी होती. परंतु आजचा निर्णय उद्यावर गेल्याने उद्या होणाऱ्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
आशापुरा मायनिंग विरोधातील २८ एप्रिल रोजी झालेल्या सुनावणीत कंपनीविरोधात आपल्याला पार्टी करुन घेण्याचा अर्ज वंदे मातरम प्रतिष्ठान या संस्थेने दिला होता. हा अर्ज आज प्रांताधिकाऱ्यांनी फेटाळून लावला. वंदे मातरम प्रतिष्ठान ही संस्था बाहेरची आहे. त्यांचा स्थानिक प्रकरणाशी कसलाही संबंध नाही. त्यामुळे त्यांना पार्टी करण्यात येऊ नये, अशी कंपनीच्या वकिलांनी हरकत घेतल्याने प्रांतांनी दावा फेटाळून लावला.
केळशी पंचक्रोशीत अनेक ग्रामस्थांनी जनसुनावणीला हजेरी लावली होती. आज निर्णय अपेक्षित होता. परंतु तक्रारदारांच्या वकिलांनी एक दिवसाची मुदतवाढ मागितली. त्यामुळे आजची सुनावणी उद्यावर गेली. उद्या होणाऱ्या सुनावणीनंतरच कंपनीचे भवितव्य ठरणार आहे. दावा फेटाळला असला तरीही आम्ही कायमस्वरुपी कंपनीला विरोध करणाऱ्याच्या बाजूने राहू, असे वंदे मातरमचे आबास पाटील म्हणाले. यावेळी आशापुरा कंपनी विरोधातील विरोध एकीकडे पाहायला मिळत आहे तर दुसरीकडे कंपनी लवकर सुरु व्हावी. कंपनी बंद असल्यामुळे कामगार व लघु उद्योजकांवर उपासमारीची वेळ येऊ लागल्याने दि. ४ एप्रिल रोजी हजारो कामगार व लघु उद्योजकांनी प्रांत कार्यालयावर मोर्चा काढून कंपनी लवकर सुरु करण्यासंदर्भात निवेदन दिले होते. (प्रतिनिधी)

कंपनीला विरोध करणाऱ्या कार्यकर्त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या येऊ लागल्या आहेत. परंतु आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहोत, आम्ही जनतेच्या हितासाठी रस्त्यावर उतरलोय.
- केदार साठे

3आशापुरा मायनिंगमुळे वायू प्रदूषण, ध्वनी प्रदूषण होत असल्याची काही ग्रामस्थांची तक्रार आहे. परंतु गेली ८ वर्षे मायनिंग क्षेत्रात काम करणाऱ्या कंपनीला आताच विरोध का केला जातोय, याचे सत्य उद्याच्या सुनावणीमुळे उजेडात येईल.


1आशापुरा मायनिंग कंपनीमुळे किती प्रमाणात प्रदूषण होऊन पर्यावरणाचा ऱ्हास होतोय. याबद्दलचा अहवाल प्रदूषण नियंत्रण मंडळाने सादर केला आहे. या अहवालानुसार कंपनीला होणारा विरोध खरोखर योग्य आहे की, सूडबुद्धीने कंपनीला टार्गेट केलं जातंय हे सिद्ध होणार आहे.


2महसूल विभागाचा अहवाल यापूर्वीच प्रांत कार्यालयाकडे सादर झाला आहे. त्यामुळे वन विभाग, महसूल विभाग, पर्यावरण विभाग यांच्या अहवालावर सुनावणीची दिशा ठरणार आहे. या अहवालातील नमूद मुद्द्यांवरच आशापुरा कंपनीचे भवितव्य ठरणार आहे.

Web Title: Today's hearing against the company

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.