Sindhudurg News: ..अन्यथा ग्रामस्थांसह आमरण उपोषण करणार, वागदेच्या सरपंचांचा इशारा

By सुधीर राणे | Published: February 28, 2023 04:33 PM2023-02-28T16:33:25+5:302023-02-28T16:33:59+5:30

महामार्ग प्राधिकरण व ठेकेदार कंपनी यांच्याकडून या कामाकडे दुर्लक्ष

The sarpanch issued a warning about the road work at Wagde on the highway in Kankavali taluka | Sindhudurg News: ..अन्यथा ग्रामस्थांसह आमरण उपोषण करणार, वागदेच्या सरपंचांचा इशारा

संग्रहीत छाया

googlenewsNext

कणकवली: गेली तीन वर्षाहून अधिक काळ कणकवली तालुक्यातील महामार्गावर वागदे येथे उभादेव समोर असलेला अपूर्ण स्थितीतील रस्ता अद्याप पूर्ण केला नसल्याने या ठिकाणी वारंवार अपघात होत आहेत. आठ दिवसात या रस्त्याचे डांबरीकरण न झाल्यास वागदे ग्रामस्थांसह आमरण उपोषण करण्याचा इशारा वागदे सरपंच संदीप सावंत यांनी दिला आहे.

दरम्यान, आठ दिवसापूर्वी यासंदर्भात आमदार नितेश राणे यांचे सुद्धा त्यांनी लक्ष वेधले होते. त्यावेळी आमदार राणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्याची माहिती सावंत यांनी दिली.      
वागदे उभादेव समोरील भागात अपूर्ण स्थितीत असलेला रस्ता काही महिन्यांपूर्वी मोकळा झाल्यानंतर या रस्त्यावरून वाहतूक सुरू झाली. परंतु या रस्त्याचे अद्याप डांबरीकरण करण्यात आले नसल्याने या भागात धुळीचे साम्राज्य पसरले आहे. त्या ठिकाणी वारंवार अपघात होत आहेत.

महामार्ग प्राधिकरण व ठेकेदार कंपनी यांच्याकडून या कामाकडे दुर्लक्ष केला जात आहे. या ठिकाणचे काम मार्गी लावण्यासाठी ठेकेदार कंपनी व महामार्ग प्राधिकरण डोळेझाक करत असल्याने वागदे सरपंच संदीप सावंत यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Web Title: The sarpanch issued a warning about the road work at Wagde on the highway in Kankavali taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.