सिंधुदुर्ग : जादूटोणा केल्याप्रकरणी पाच संशयितांना न्यायालयीन कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2018 04:25 PM2018-06-19T16:25:10+5:302018-06-19T16:25:10+5:30

जादूटोणा करण्यासाठी सुमारे दोन लाख ३८ हजार रुपये लाटल्याप्रकरणी अटकेत असलेल्या भोंदू बाबा तुकाराम मेस्त्री उर्फ महेश पांचाळ याच्यासह अन्य चार संशयित आरोपींना येथील न्यायालयात हजर केले असता पंधरा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

Sindhudurg: Judicial custody of five suspects for witchcraft | सिंधुदुर्ग : जादूटोणा केल्याप्रकरणी पाच संशयितांना न्यायालयीन कोठडी

सिंधुदुर्ग : जादूटोणा केल्याप्रकरणी पाच संशयितांना न्यायालयीन कोठडी

Next
ठळक मुद्देजादूटोणा केल्याप्रकरणी पाच संशयितांना न्यायालयीन कोठडी चार संशयितांची रवानगी सावंतवाडी कारागृहात

मालवण : जादूटोणा करण्यासाठी सुमारे दोन लाख ३८ हजार रुपये लाटल्याप्रकरणी अटकेत असलेल्या भोंदू बाबा तुकाराम मेस्त्री उर्फ महेश पांचाळ याच्यासह अन्य चार संशयित आरोपींना येथील न्यायालयात हजर केले असता पंधरा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

त्यानुसार सायंकाळी उशिरा पांचाळ व अन्य चार संशयितांची रवानगी सावंतवाडी येथील कारागृहात करण्यात आली आहे. अशी माहिती तपासिक पोलीस निरीक्षक एस. जी. शिंदे यांनी दिली.

कौटुंबिक कलह दूर करण्याबरोबर व्यवसायात यश मिळवून देण्यासाठी कृष्णा चव्हाण यांच्यासह अन्य सात जणांची फसवणूक करत दोन लाख ३८ हजार रुपये लाटल्याप्रकरणी पोलिसांनी तुकाराम मेस्त्री ऊर्फ महेश पांचाळ या मुख्य संशयितासह शैलेंद्र मुरलीधर राजाध्यक्ष (५०), श्रीधर गुणाजी सर्पे (६०), विनायक राजाराम राऊळ (६५, तिन्ही रा. कसवण-कणकवली) या तिघांना अटक करण्यात आली होती.

पोलिसांनी रविवारी प्रवीण दत्ताराम पांचाळ (रा. चेंबूर-मुंबई) याला मुंबईतून ताब्यात घेतले. त्याने तक्रारदार कृष्णा चव्हाण यांची मुलगी ममता हिच्याकडे पूजाविधी करण्यास मदत केली होती.

देवगडचे पोलीस निरीक्षक एस. जी. शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जी. व्ही. वारंग, राजन पाटील, मिलिंद परब, मनोज पुजारे यांच्या पथकाने त्याला मुंबईतून ताब्यात घेतले.

जादूटोणा प्रकरणातील या सर्व संशयित आरोपींना सोमवारी येथील न्यायालयात हजर केले असता पंधरा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यानुसार त्यांची रवानगी सावंतवाडी येथील कारागृहात करण्यात आली आहे.

या प्रकरणातील संशयित आरोपी शैलेंद्र राजाध्यक्ष याच्याकडून दहा हजार रुपये हस्तगत करण्यात आले आहे तर अन्य ठिकाणाहून तुकाराम मेस्त्री याने केलेल्या जादूटोण्याचे साहित्य हस्तगत करण्यात आले आहे. या प्रकरणी भोंदू बाबा तुकाराम मेस्त्री याच्या कुटुंबियांचीही चौकशी केली जाणार असल्याचे पोलीस निरीक्षक शिंदे यांनी स्पष्ट केले.

Web Title: Sindhudurg: Judicial custody of five suspects for witchcraft

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.