शॉर्टसर्किटने काजू कलमे जळाली लाखो रुपयांचे नुकसान : निरवडे-माळकरवाडी माळावरील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2019 05:35 PM2019-04-19T17:35:44+5:302019-04-19T17:36:36+5:30

निरवडे-माळकरवाडी येथे विद्युत खांबावर शार्टसर्किट झाल्याने आगीची  ठिणगी उडून  माळावरील  सुमारे सहाशे काजू कलमे जळून ग्रामस्थांचे लाखो

Shortscreating losses of millions of rupees in cashew nuts: Nirvade-Malkarwadi incident | शॉर्टसर्किटने काजू कलमे जळाली लाखो रुपयांचे नुकसान : निरवडे-माळकरवाडी माळावरील घटना

निरवडे-माळकरवाडी येथे काजू बागेला आग लागून मोठे नुकसान झाले.  

Next

सावंतवाडी : निरवडे-माळकरवाडी येथे विद्युत खांबावर शार्टसर्किट झाल्याने आगीची  ठिणगी उडून  माळावरील सुमारे सहाशे काजू कलमे जळून ग्रामस्थांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. ही घटना गुरुवारी दुपारी  साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली.

निरवडे येथे साई होली फेथ स्कूलनजीक असलेल्या माळरानावर तेथील ग्रामस्थांची काजू बागायत आहे. सुमारे तीन वर्षांची असलेली काजू कलमे गुरुवारी दुपारी लागलेल्या या आगीत जळून खाक झाली. बागायतीमधून गेलेल्या विद्युत वाहिनीत शॉर्टसर्किट झाल्याने ही आग लागली. दरम्यान, रस्त्याने जाणाºया वाहन चालकाने हा प्रकार स्थानिक ग्रामस्थांच्या नजरेस आणून दिला. त्यानंतर घटनास्थळी ग्रामस्थांनी धाव घेत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, भर दुपार असल्याने व वारा असल्याने आग भडकली. यात ग्रामस्थांचे प्रयत्न अपुरे ठरले.

आगीत रंजन गावडे, रुक्मिणी गावडे, दत्ताराम गावडे, यशोदा गावडे, कालिंदी माळकर, दीपक जोशी आदींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. जळालेल्या ६०० काजू कलमांसोबत सात आंबा कलमेही आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. यात झाडावरील आंबे व काजू कलमांवरील काजू अक्षरश: होरपळून गेली. त्यामुळे शेतकरी व ग्रामस्थांच्या डोळ््यात अश्रू दाटून आले होते. 

नुकसानीचा नेमका आकडा समजला नसला तरी लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे स्थानिकांनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच निरवडे सरपंच प्रमोद गावडे, पोलीस पाटील अजित वैज यांच्यासह वीज वितरण अधिकाºयांनी घटनास्थळी धाव घेतली. निवडणुकीची  रणधुमाळी असल्याने महसूल यंत्रणा घटनास्थळी पोहोचू शकली नाही. मात्र, कृषी विभागाकडून सायंकाळी उशिरा आगीचा पंचनामा करण्यात आल्याचे निरवडे सरपंच प्रमोद गावडे यांनी सांगितले.

 

 

Web Title: Shortscreating losses of millions of rupees in cashew nuts: Nirvade-Malkarwadi incident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.