काशिनाथ दुभाषींचा शिवसेनेला जय महाराष्ट्र, काँग्रेसमध्ये प्रवेश, सावंतवाडी शहराध्यक्षपदाची जबाबदारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2017 02:31 PM2017-12-06T14:31:03+5:302017-12-06T14:35:27+5:30

शिवसेना पक्षप्रमुखांच्या उपस्थितीत काँगे्रसमधून शिवसेनेत प्रवेश केलेले काशिनाथ दुभाषी यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करीत काँग्रेस प्रदेश चिटणीस रामचंद्र दळवी यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विकास सावंत, जिल्हा सरचिटणीस राजू मसुरकर, प्रदेश सदस्य डॉ. जयेंद्र परूळेकर, तालुकाध्यक्ष रवींद्र म्हापसेकर आदी उपस्थित होते. दुभाषी हे शिवसेनेकडून नगरसेवकपदाची उमेदवारी नाकारल्यापासून नाराज होते.

Kashinath interpreter Shiv Sena, Jai Maharashtra, admission in Congress, Sawantwadi City President | काशिनाथ दुभाषींचा शिवसेनेला जय महाराष्ट्र, काँग्रेसमध्ये प्रवेश, सावंतवाडी शहराध्यक्षपदाची जबाबदारी

काशिनाथ दुभाषी यांनी प्रदेश चिटणीस रामचंद्र दळवी यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी विकास सावंत, राजू मसुरकर, जयेंद्र परूळेकर, रवींद्र म्हापसेकर आदी उपस्थित होते.

Next
ठळक मुद्देशिवसेनेकडून नगरसेवकपदाची उमेदवारी नाकारल्यापासून दुभाषी नाराज काँग्रेसच्या प्रतिसादाला होकार, सावंतवाडी शहरअध्यक्षपदाची जबाबदारी

सावंतवाडी : शिवसेना पक्षप्रमुखांच्या उपस्थितीत काँगे्रसमधून शिवसेनेत प्रवेश केलेले काशिनाथ दुभाषी यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करीत काँग्रेस प्रदेश चिटणीस रामचंद्र दळवी यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विकास सावंत, जिल्हा सरचिटणीस राजू मसुरकर, प्रदेश सदस्य डॉ. जयेंद्र परूळेकर, तालुकाध्यक्ष रवींद्र म्हापसेकर आदी उपस्थित होते. दुभाषी हे शिवसेनेकडून नगरसेवकपदाची उमेदवारी नाकारल्यापासून नाराज होते.


त्यांनी आपली नाराजी मंत्री दीपक केसरकर यांना बोलूनही दाखविली होती. पण त्यांना अपेक्षित असा प्रतिसाद मिळाला नव्हता. त्यामुळे ते नाराज होते. त्यातच त्यांना काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेत्यांनी संपर्क केला होता.

अखेर मंगळवारी त्यांनी काँग्रेसच्या प्रतिसादाला होकार दिला व प्रदेश चिटणीस रामचंद्र दळवी यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांच्यावर काँग्रेसने सावंतवाडी शहरअध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे.
यावेळी माजी तालुका उपाध्यक्ष दाजी धुरी, गणेश निंबाळकर, दिलीप नाईक, चारूदत्त शिरसाट, सुनील नाईक, विजय मुंडये आदी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.

शिवसेनेने उमेदवारी नाकारली

काशिनाथ दुभाषी हे मूळचे काँग्रेसचे. त्यांच्या वडिलांनी काँग्रेसची विविध पदे सांभाळली होती. मात्र तीन वर्षांपूूर्वीच म्हणजे विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमधून दीपक केसरकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यावेळी त्यांच्यासोबत काशिनाथ दुभाषी यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला होता.

त्यानंतर त्यांना शिवसेनेकडून नगरसेवकपदाची उमेदवारी मिळेल, अशी अटकळ बांधली जात होती. पण आयत्या वेळी त्यांना शिवसेनेकडून उमेदवारी नाकारण्यात आली होती.

 

Web Title: Kashinath interpreter Shiv Sena, Jai Maharashtra, admission in Congress, Sawantwadi City President

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.