'आपले सरकार केंद्रावर' उपलब्ध होणार गोल्ड कार्ड :अतुल काळसेकर यांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2019 04:21 PM2019-02-22T16:21:16+5:302019-02-22T16:24:00+5:30

आयुष्यमान भारत योजनेचा" लाभ मिळविण्यासाठी लाभार्थ्यांकडे गोल्ड कार्ड असणे आवश्यक आहे. आता सिंधुदुर्ग जिल्ह्यात ठिकठीकाणी असलेल्या 'आपले सरकार केंद्रावर' हे गोल्ड कार्ड उपलब्ध होणार आहे.अशी माहिती भाजपाचे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे माजी अध्यक्ष अतुल काळसेकर यांनी दिली आहे.

Gold Card will be available at your government center: Atul Kalsekar's information | 'आपले सरकार केंद्रावर' उपलब्ध होणार गोल्ड कार्ड :अतुल काळसेकर यांची माहिती

'आपले सरकार केंद्रावर' उपलब्ध होणार गोल्ड कार्ड :अतुल काळसेकर यांची माहिती

googlenewsNext
ठळक मुद्दे'आपले सरकार केंद्रावर' उपलब्ध होणार गोल्ड कार्ड अतुल काळसेकर यांची माहिती

कणकवली : आयुष्यमान भारत योजनेचा" लाभ मिळविण्यासाठी लाभार्थ्यांकडे गोल्ड कार्ड असणे आवश्यक आहे. आता सिंधुदुर्ग जिल्ह्यात ठिकठीकाणी असलेल्या 'आपले सरकार केंद्रावर' हे गोल्ड कार्ड उपलब्ध होणार आहे.अशी माहिती भाजपाचे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे माजी अध्यक्ष अतुल काळसेकर यांनी दिली आहे.

याबाबत त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेच्या सार्वजनिक आरोग्याचा विचार करून 'प्रधानमंत्री जन आरोग्य' योजने अंतर्गत "आयुष्यमान भारत योजनेचा" शुभारंभ केला आहे. या योजनेचा लाभ अचूक लाभार्थांपर्यंत पोचवण्यासाठी अद्ययावत डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करत केंद्र सरकारने 'आपले सरकार 'या भारत सरकार च्या माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या कंपनिशी राष्ट्रीय आरोग्य समिती सोबत करार केला आहे.

त्यानुसार फक्त जिल्हा रुग्णालयातुन वितरण होणारे 'गोल्ड कार्ड ' आता आपले सरकार केंद्रातून मिळणार आहे.
यापूर्वी अनेक नागरिकांना फक्त जिल्हा रुग्णालयाच्या ठिकाणी गोल्ड कार्ड काढण्यासाठी जाणे सोयीचे नव्हते. त्यामुळे अनेक नागरिक या सुविधे पासून वंचित राहिले होते. संबधित सुविधा आपले सरकार केंद्रात उपलब्ध व्हावी , जेणेकरून नागरिकांना सोयीचे ठरेल अशी भूमिका मी घेतली. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रिय वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू यांची भेट घेतली. गोल्ड कार्ड वितरणाबाबत नक्की समस्या काय आहे? नागरिक यापासून कसे वंचित रहात आहेत ? ते सविस्तर स्पष्ट केले आणि पत्रव्यवहार केला.

त्यांनतर केंद्रिय वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू यांनी माझे पत्र कार्यवाही करिता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडे व मुख्यमंत्र्यांकडे पाठविले . तसेच कार्यवाहीचे आदेश दिले. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांना प्रत्येक 'आपले सरकार केंद्रावर' आयुशमान भारत योजने अंर्तगत असणारे गोल्ड कार्ड उपलबद्ध होणार आहे.

या योजनेमुळे नागरिकांना तब्बल पाच लाखांपर्यंतच्या आरोग्य सुविधा मोफत मिळणार असून महात्मा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत असलेली सर्व इस्पितळे व या योजने अंतर्गत असलेल्या सर्व सुविधा देखिल प्रधान मंत्री जन आरोग्य योजने अंतर्गत समाविष्ठ करण्यात येणार आहेत. फक्त राज्यातच नाही तर देशभरात या सुविधा मिळणार आहेत.

आजच्या घडीला नागरिकांना बेळगाव किंवा गोवा येथे उपचाराकरिता गेले असता पैसे मोजावे लागतात. मात्र , या गोल्ड कार्डमुळे उपचार मोफत होणार आहेत. असेही या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

Web Title: Gold Card will be available at your government center: Atul Kalsekar's information

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.