करुळ घाटात डंपर कोसळला; चालकाशी संपर्क तुटला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2023 11:44 AM2023-08-19T11:44:03+5:302023-08-19T11:44:15+5:30

- प्रकाश काळे लोकमत न्यूज नेटवर्क  वैभववाडी( सिंधुदुर्ग ): करुळ घाटात पहाटेच्या सुमारास डंपरला अपघात झाला. चालकाचा ताबा सुटून ...

Dumper collapses in Karul Ghat; Lost contact with the driver | करुळ घाटात डंपर कोसळला; चालकाशी संपर्क तुटला

करुळ घाटात डंपर कोसळला; चालकाशी संपर्क तुटला

googlenewsNext

- प्रकाश काळे
लोकमत न्यूज नेटवर्क 
वैभववाडी(सिंधुदुर्ग): करुळ घाटात पहाटेच्या सुमारास डंपरला अपघात झाला. चालकाचा ताबा सुटून डंपर दरीत कोसळला. चालकाशी संपर्क होत नसल्याने तो डंपरखाली दरीत अडकला असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

    या अपघाताची माहिती समजताच पोलिस हवालदार राहुल पवार तातडीने अपघातस्थळी पोहोचले. त्यांनी पोलिस निरीक्षक आणि सह्याद्री जीवरक्षक संस्थला अपघाताची माहिती दिली. त्यामुळे पोलिस निरीक्षक फुलचंद मेंगडे, हवालदार नितीन खाडे, पोलिस नाईक राहुल पवार, रमेश नारनवर, पोलिस शिपाई अजित पडवळ, हरिश जायभाय आणि सह्याद्री जीवरक्षक संस्थेचे पथक बचावकार्यासाठी अपघातस्थळी पोहोचले आहेत.

     नवीन चौगुले असे चालकाचे नाव असल्याचे समजते. हा डंपर सिलिका वाळू भरुन कणकवलीहून कोल्हापूरकडे निघाला होता. पोलिस आणि सह्याद्री जीवरक्षक संस्थेचे पथक बचावकार्य सुरु केले आहे.

Web Title: Dumper collapses in Karul Ghat; Lost contact with the driver

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.