अवकाळी पावसामुळे आंबा पिकाचे नुकसान, तातडीने भरपाई द्या; देवगडमध्ये भाजपची निवेदनद्वारे मागणी

By महेश विद्यानंद सरनाईक | Published: January 10, 2024 05:04 PM2024-01-10T17:04:09+5:302024-01-10T17:04:50+5:30

देवगड ( सिंधुदुर्ग ) : अवकाळी पावसामुळे आंबा पिकाचे नुकसान झाले असून तातडीने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी भाजपाचे ...

Damage to mango crop due to unseasonal rains, provide immediate compensation; BJP's demand in Devgad through a memorandum | अवकाळी पावसामुळे आंबा पिकाचे नुकसान, तातडीने भरपाई द्या; देवगडमध्ये भाजपची निवेदनद्वारे मागणी

अवकाळी पावसामुळे आंबा पिकाचे नुकसान, तातडीने भरपाई द्या; देवगडमध्ये भाजपची निवेदनद्वारे मागणी

देवगड (सिंधुदुर्ग) : अवकाळी पावसामुळे आंबा पिकाचे नुकसान झाले असून तातडीने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी भाजपाचे जिल्हा सरचिटणीस आरीफ बगदादी यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देत भाजपाने केली आहे.

देवगडचे तहसीलदार खत्री यांची आज भेट देऊन हे निवेदन देण्यात आले. या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, देवगड तालुक्यामध्ये दोन दिवसांपूर्वी अवकाळी पाऊस पडून आंबा कलमावरील मोहोर व आंबा फळांचे नुकसान झाले आहे.

आंबा उत्पादन समाधान कारक व्हावे या हेतूने खते, किटकनाशके, मेहनत मजूरी, यावर लाखो रुपये खर्च करून अवकाळी पडलेल्या पावसाने शेतकऱ्यांची निराशा केली आहे. आधीच कर्जबाजारी असलेले आंबा बागायतदार, हाता तोंडाशी आलेले आंबा पिक वाया जात असलेले पाहून हताश झाले आहेत.

तरी सदर घटनेचे गांर्भीय विचारात घेवून संबंधित नुकसानी बाबत तातडीने पंचनामे करुन, शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी शासनाला सूचित करावे. तसेच पिक विमा रक्कमेचा पूर्ण परतावादेखील तत्काळ शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी संबंधित विमा कंपन्यांना सूचना कराव्यात अशी विनंती केली आहे.  हे निवेदन देण्यासाठी पडेलचे सरपंच भूषण पोकळे, वैभव वारीक, युवा मोर्चाचे शहराध्यक्ष दया पाटील, कृषी सेलचे अध्यक्ष भूषण बोडस यांच्यासह अनेक जण उपस्थित होते.

Web Title: Damage to mango crop due to unseasonal rains, provide immediate compensation; BJP's demand in Devgad through a memorandum

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.