शिवसेनेकडून किल्ले सिंधुदुर्गवर स्वच्छता मोहीम, आमदारांची उपस्थिती : पुरातत्वला साफसफाईच्या सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2017 04:56 PM2017-11-17T16:56:29+5:302017-11-17T17:02:06+5:30

मालवण येथील ऐतिहासिक किल्ले सिंधुदुर्गवर बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त तालुका शिवसेनेच्यावतीने स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत आमदार वैभव नाईक यांच्यासह नगराध्यक्ष, तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी, महिला सहभागी झाल्या होत्या. ग्रामपंचायतीने किल्ल्यात स्वच्छता तसेच अन्य सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशा सूचना आमदार नाईक यांनी केल्या.

Cleanliness campaign on Shivsena, Sindhudurg, presence of MLAs: Archaeological cleanup instructions | शिवसेनेकडून किल्ले सिंधुदुर्गवर स्वच्छता मोहीम, आमदारांची उपस्थिती : पुरातत्वला साफसफाईच्या सूचना

किल्ले सिंधुदुर्गवर तालुका शिवसेनेच्यावतीने स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यावेळी आमदार वैभव नाईक यांच्यासह शिवसेना पदाधिकारी सहभागी झाले होते.

Next
ठळक मुद्देआमदारांची उपस्थिती पुरातत्वला साफसफाईच्या सूचना

मालवण : येथील ऐतिहासिक किल्ले सिंधुदुर्गवर बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त तालुका शिवसेनेच्यावतीने स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत आमदार वैभव नाईक यांच्यासह नगराध्यक्ष, तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी, महिला सहभागी झाल्या होत्या. ग्रामपंचायतीने सिंधुदुर्ग किल्ल्यात स्वच्छता तसेच अन्य सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशा सूचना आमदार नाईक यांनी केल्या.


शिवसेनेच्यावतीने गुरुवारी सकाळपासून सिंधुदुर्ग किल्ल्यावर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यात तटबंदीवरील झाडी, शिवराजेश्वर मंदिराकडे जाणाºया मार्गाच्या दुतर्फा असलेली झाडी तसेच अन्य भागातील झाडी पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच अन्य कामगारांनी हटवित त्याची विल्हेवाट लावली.


सकाळच्या सत्रात उपतालुकाप्रमुख हरी खोबरेकर, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, नगरसेवक पंकज साधये, शहरप्रमुख गणेश कुडाळकर, महिला नगरसेविका, शिवसेनेचे अन्य पदाधिकारी तसेच वायरी भुतनाथ ग्रामपंचायत सरपंच ललित वराडकर, भाई ढोके यांच्यासह अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते यांचा या स्वच्छता मोहिमेत उत्स्फूर्त सहभाग लाभला.


दुपारच्या सत्रात आमदार वैभव नाईक यांनी किल्ला स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला. पुरातत्त्व विभागाकडून किल्ल्यात दरवर्षी साफसफाई होणे आवश्यक असल्याचे आमदार नाईक यांनी स्पष्ट केले. यावर किल्लेदार हरीश गुजराथी यांनी दरवर्षी पुरातत्त्व विभागाच्यावतीने किल्ल्यात साफसफाई केली जाते. मात्र, यावर्षी अद्याप कामगार न आल्याने ही साफसफाई झाली नाही असे स्पष्ट केले.

Web Title: Cleanliness campaign on Shivsena, Sindhudurg, presence of MLAs: Archaeological cleanup instructions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.