सिंधुदुर्ग जिल्ह्याचे लक्ष : कणकवलीनंतर दोडामार्ग नगराध्यक्ष निवडीबाबत उत्सुकता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2018 03:14 PM2018-04-14T15:14:25+5:302018-04-14T15:14:25+5:30

कणकवली नगरपंचायतीवर स्वाभिमानाचा झेंडा फडकविल्यानंतर लवकरच होणाऱ्या कसई-दोडामार्ग नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष निवडीवर आता जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Attention of Sindhudurg district: Curiosity to select Doda Marg city corporation after Kankavli | सिंधुदुर्ग जिल्ह्याचे लक्ष : कणकवलीनंतर दोडामार्ग नगराध्यक्ष निवडीबाबत उत्सुकता

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे लक्ष : कणकवलीनंतर दोडामार्ग नगराध्यक्ष निवडीबाबत उत्सुकता

googlenewsNext
ठळक मुद्देकणकवलीनंतर आता दोडामार्ग नगराध्यक्ष निवडीबाबत उत्सुकतापुन्हा स्वाभिमान की शिवसेना-भाजप ?

वैभव साळकर 

दोडामार्ग : कणकवली नगरपंचायतीवर स्वाभिमानाचा झेंडा फडकविल्यानंतर लवकरच होणाऱ्या कसई-दोडामार्ग नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष निवडीवर आता जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

जेमतेम दीड महिन्यावर येऊन ठेपलेल्या या निवडणुकीत सेना-भाजप हे दोन्ही मित्रपक्ष युतीवर ठाम राहतील का, की अडीच वर्षापूर्वी घडलेल्या दोघांच्याही अतिविश्वासाची पुनर्रावृत्ती पुन्हा होऊन स्वाभिमान व राष्ट्रवादी त्यांचा पुन्हा एकदा फायदा उठविण्याची खेळी करून त्याची यशस्वी होते का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

तालुक्याच्या ठिकाणी ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायतीत करण्याचा निर्णय तत्कालीन काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारने घेतल्यानंतर सेना-भाजप युतीच्या काळात त्याची अंमलबजावणी होत कसई-दोडामार्ग ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायतीत झाले.

या नव्याने निर्माण झालेल्या नगरपंचायतीची निवडणूक अडीच वर्षापूर्वी होऊन १७ नगरसेवक निवडून आले. त्यात भाजपला ५, सेनेला ५, काँग्रेसला ४, राष्ट्रवादीला २ तर मनसेला केवळ १ जागा मिळाली.

साहजिकच निवडणुकीच्या निकालादिवशी नगरपंचायतीवर सेना-भाजप युतीचा नगराध्यक्ष बसणार असे चित्र स्पष्ट झाले. मात्र, प्रत्यक्षात पुरेसे संख्याबळ नसतानाही काँग्रेस राष्ट्रवादीने प्रत्यक्ष नगराध्यक्ष निवडीवेळी सेना भाजप व मनसेचा प्रत्येकी एक असा नगरसेवक गळाला लावून नगराध्यक्ष म्हणून संतोष नानचे यांना निवडून आणत नगर पंचायतीवर काँग्रेस-राष्ट्रवादीने वर्चस्व मिळविले.

त्यावेळी नाराज असलेल्या भाजपच्या नगरसेविका रेश्मा कोरगावकर, सेनेच्या संध्या प्रसादी यांनी संतोष नानचे यांना मदत केली. त्यामुळे मनसेचा एक मिळून ९ विरुद्ध ८ अशा फरकाने नगराध्यक्ष म्हणून संतोष नानचे विजयी झाले होते.

त्यानंतरच्या काळात सेनेने अंतर्गत बंदी कायद्यानुसार जिल्हाधिकाºयांकडे तक्रार करून सेनेच्या नगरसेविका संध्या प्रसादी यांना बाद ठरविले. या रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक होऊन तेथे काँग्रेसच्या अदिती मणेरीकर निवडून आल्या. त्यामुळे नगरपंचायतीमधील काँग्रेसचे संख्याबळ आता एकने वाढून पाचवर पोहोचले आहे. अर्थात सध्याच्या घडीला या पाचही नगरसेवकांनी स्वाभिमानाचा झेंडा खांद्यावर घेतला आहे.

अडीच वर्षानंतर आता नगराध्यक्ष पुन्हा एकदा बदलणार आहे. सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी नगराध्यक्षपद आरक्षित झाल्याने सेना व भाजप या दोन पक्षांमध्ये इच्छुकांची संख्या वाढली आहे. भाजपमधून वैष्णवी रेडकर व रेश्मा कोरगावकर नगराध्यक्षपदासाठी इच्छुक आहेत. तर सेनेमधून लीना कुबल व साक्षी मिरकर इच्छुक आहेत.

मागच्या निवडणुकीत नगराध्यक्षपदावर भाजपने दावा केला होता व सेनेला अडीच वर्षानंतर संधी देण्यात येईल असा फॉर्म्युला ठरविण्यात आला होता. मात्र, सध्या तरी दोन्ही पक्षात इच्छुक असल्याने हे दोन्ही मित्रपक्ष वेगवेगळे लढतील की युतीवर ठाम राहतील, हे तूर्तास तरी सांगणे कठीण आहे.

या उलट काँग्रेस अर्थात स्वाभिमानचे ५ नगरसेवक असून राष्ट्रवादीचे २ असे मिळून स्वाभिमान व राष्ट्रवादी असे मिळून दोघांची संख्याबळ ७ होईल. तर मनसेने साथ दिल्यास केवळ एका नगरसेवकाची आवश्यकता युती झाल्यास स्वाभिमानला लागेल. मात्र तिन्ही पक्ष स्वतंत्र लढल्यास स्वाभिमानाची संख्याबळाच्या आधारावर सरशी होईल.

यावेळच्या नगराध्यक्ष निवडीत सेना आपल्या मतावर ठाम राहिल्यास भाजप व स्वाभिमान-राष्ट्रवादी आघाडी असा पर्याय पुढे येऊ शकतो. एकंदरीत या सर्व शक्यता गृहीत धरून तिन्ही पक्षांच्या नेतेमंडळींनी मोर्चेबांधणीस सुरुवात केली असून आपापल्या पक्षाचा नगराध्यक्ष बसविण्यासाठी व्यूहरचना आखण्यास सुरुवात केली आहे.

उपनगराध्यक्ष पदासाठीही रस्सीखेच

कसई-दोडामार्ग नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाबरोबरच उपनगराध्यक्षपदाचीही निवड होणार आहे. उपनगराध्यक्ष पदासाठी स्वाभिमानकडून विद्यमान नगराध्यक्ष संतोष नानचे यांचे तर भाजपकडून गटनेते चेतन चव्हाण यांचे नाव चर्चेत आहे. त्यामुळे उपनगराध्यक्षपदावरच नगराध्यक्ष पदाची गणिते अवलंबून असल्याने उपनगराध्यक्ष कोण होतो हा देखील औत्सुक्याचा विषय ठरला आहे.

तिन्ही पक्षांच्या मोर्चेबांधणीस सुरुवात

एकंदरीत सर्व शक्यता गृहीत धरून तिन्ही पक्षांच्या नेतेमंडळींनी मोर्चेबांधणीस सुरुवात केली असून आपापल्या पक्षाचा नगराध्यक्ष बसविण्यासाठी व्यूहरचना आखण्यास सुरुवात केली आहे.

असे आहे संख्याबळ
स्वाभिमान-५, राष्ट्रवादी-२, सेना- ४, भाजप- ५ , मनसे- १

२्रल्लँि४स्रँङ्म३ङ्म01
कसई-दोडामार्ग नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष बदलाचे वारे वाहू लागले आहेत.

Web Title: Attention of Sindhudurg district: Curiosity to select Doda Marg city corporation after Kankavli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.