उदयनराजेंविरोधात युतीकडून कोण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2019 10:54 PM2019-03-10T22:54:49+5:302019-03-10T22:54:54+5:30

दीपक शिंदे । लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : सातारा लोकसभा मतदार संघासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने विद्यमान खासदार उदयनराजे भोसले यांनाच ...

Who is from the Alliance against Udayan Raza? | उदयनराजेंविरोधात युतीकडून कोण?

उदयनराजेंविरोधात युतीकडून कोण?

Next

दीपक शिंदे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : सातारा लोकसभा मतदार संघासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने विद्यमान खासदार उदयनराजे भोसले यांनाच पुन्हा उमेदवारी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांचा विरोध असतानाही सर्वांना एकत्र बसवून त्यांची दिलजमाई करत पुन्हा उदयनराजे भोसले हेच राष्ट्रवादीचे उमेदवार असतील आणि त्यांना सर्वांनी मदत करायची, असा आदेशच पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी दिला. त्यामुळे आता लोकसभेसाठी तिसऱ्यांदा सातारा लोकसभा मतदार संघातून उदयनराजे भोसले निवडणूक लढणार आहेत.
युतीमध्ये हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला आला आहे. मात्र जागा कोणी लढवायची याबाबत अजूनही निर्णय झालेला नाही. उदयनराजे भोसले यांना तगडे आव्हान देईल, असा उमेदवार सध्यातरी शिवसेनेकडे नाही. भाजपकडून अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी तयारी सुरू केली आहे. मात्र, भाजपने ते लोकसभेसाठी भाजपचे उमेदवार असतील, असे जाहीर केलेले नाही. शिवसेनेने सातारा लोकसभा मतदारसंघ हा आपला आहे असे जाहीर केले असले तरी त्यांनी देखील आपला उमेदवार कोण असेल हे जाहीर केलेले नाही. त्यामुळे उदयनराजेपुढे तगडे आव्हान उभे करण्यासाठी युतीला चांगला उमेदवार द्यावा लागणार आहे. पुरुषोत्तम जाधव यांनीही तयारी सुरू केली आहे. मात्र, ते कोणाकडून लढणार हे स्पष्ट नाही. त्यांनी दोनवेळा उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन इच्छा व्यक्त केली आहे. मात्र, त्यांना हिरवा कंदील मिळालेला नाही.
सातारा लोकसभा मतदार संघामध्ये वाई, कोरेगाव, कºहाड उत्तर, कºहाड दक्षिण, पाटण आणि सातारा हे विधानसभा मतदारसंघ येतात. या मतदार संघातील केवळ पाटण मतदारसंघात शिवसेनेचा आमदार आहे. उर्वरित पाचही मतदारसंघात राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे आमदार असल्याने या आमदारांनी प्रामाणिक मदत केली तर आघाडीच्या उमेदवाराचा विजय निश्चित मानला जात आहे.
खासदार उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी मिळो अथवा न मिळो आपली स्वतंत्र तयारी सुरू केली होती. त्यानुसार त्यांनी सातारा आणि माढा लोकसभा मतदार संघामध्येही आपले वेगळे गट तयार केले होते. त्यांची त्यांना मदत होणार आहे. त्याबरोबरच शिवसेना आणि भाजपसोबतही उदयनराजे यांनी चांगले संबंध ठेवल्यामुळे केवळ विरोधासाठी उमेदवार देण्याची शक्यता आहे. त्यामुळे सातारा लोकसभा मतदार संघातून मोठे आव्हान देणारा उमेदवार सध्या तरी दिसत नाही.
गेल्या निवडणुकीत उदयनराजे भोसले व पुरुषोत्तम जाधव यांना विधानसभा मतदार संघनिहाय मिळालेली मते
मतदार संघ उदयनराजे पुरुषोत्तम जाधव
वाई ९००३३ ४१२६३
कोरेगाव ९३०५० १३१८३
कºहाड उत्तर ९३६२० २१०३२
कºहाड दक्षिण ६१६४८ ५२५८४
पाटण ७१८३२ १६५०८
सातारा १११९७० ११२१९
एकूण मते ५२२१५३ १५५७८९

Web Title: Who is from the Alliance against Udayan Raza?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.