जिल्ह्यात आज मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2017 10:47 PM2017-10-15T22:47:38+5:302017-10-15T22:47:38+5:30

Polling in the district today | जिल्ह्यात आज मतदान

जिल्ह्यात आज मतदान

Next



लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : जिल्ह्यातील २५६ ग्रामपंचायतींसाठी सोमवारी (दि. १६) मतदान होणार आहे. मतदान प्रक्रियेसाठी ११ तालुक्यांतील प्रशासन सज्ज झाले आहे. निवडणूक कर्मचारी व मतदान प्रक्रियेवेळी बंदोबस्तासाठी असणारे पोलिस अधिकारी, कर्मचारी जिल्ह्यातील २५६ गावांकडे रवाना झाले आहेत.
सोमवारी मतदान मशीनची चाचणी करून मतदानाला सुरुवात होणार आहे. सोमवारी सकाळी साडेसात ते साडेपाच यावेळेत मतदान होणार आहे. सातारा जिल्ह्यातील ३१९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला होता. यापैकी सातारा तालुक्यातील नित्रळ ग्रामपंचायतीची निवडणूक रद्द झाली. तर ६२ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने उर्वरित २५६ ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक होणार आहे.
सरपंच व सदस्य अशा एकूण २ हजार ३६७ जागांसाठी निवडणूक होणार आहे. ८८५ केंद्रांवर मतदान प्रक्रिया होणार आहे. सातारा तालुक्यात ९७, जावळीत २७, कोरेगावात १३२, वाईत ३२, खंडाळ्यात १६, महाबळेश्वरात ३, कºहाडात १३६, पाटणमध्ये २१८, माणमध्ये ७६, खटाव तालुक्यात ५४, फलटणमध्ये ९४ मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. प्रत्येक केंद्रावर दोन मतदान मशीन असणार आहेत. मतदानादरम्यान काही बिघाड झाल्यास नवीन मशीन त्या ठिकाणी बसविली जाणार आहे. मतदानादिवशी सोमवारी उमेदवारांच्या प्रतिनिधींसमोर मतदान मशीनची चाचणी घेतली जाणार असून, त्यानंतर मतदानाला सुरुवात होईल.
सातारा भू-विकास बँक सभागृह, जावळी तहसील कार्यालय, मेढा, कोरेगाव गणेश हॉल, सरस्वती विद्यामंदिर, वाई देशभक्त किसन वीर सभागृह पंचायत समिती, खंडाळा किसन वीर सभागृह, पंचायत समिती, महाबळेश्वर तहसील कार्यालय, कºहाड दिवंगत यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय केंद्र, शनिवार पेठ, पाटण शासकीय धान्य गोदाम, शिरळ, माण डी. एस. पाटील सभागृह, खटाव नवीन प्रशासकीय इमारत, वडूज, फलटण नवीन धान्य गोदाम, फलटण येथे स्ट्राँग रूम करण्यात आल्या असून, याच ठिकाणी मतमोजणी करण्यात येणार आहे.
मायणीत पोलिसांचे संचलन
मायणी ग्रामपंचायतीसाठी सोमवारी मतदान होत असून, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी संपूर्ण बाजार पेठेतून संचलन केले. यावेळी पोलिस उपअधीक्षक यशवंत काळे यांच्यासह सहायक पोलिस निरीक्षक संतोष गोसावी उपस्थित होते.
मायणी, ता. खटाव ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी सोमवारी मतदान होत आहे. मायणी हे गाव संवेदनशील आहे. त्यामुळे पोलिस दलाने विविध उपाययोजना केल्या आहेत. तसेच पोलिस दलाकडून यापूर्वीच १४८ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. सोमवारी होत असलेल्या मतदानावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून रविवारी सायंकाळी पाच वाजता पोलिसांनी गावात संचलन केले. यावेळी पोलिस ठाण्यापासून चाँदणी चौक, मराठी शाळा, बसस्थानक, चावडी चौक, उभी पेठ, नवी पेठ येथून पुन्हा मुख्य रस्त्याने पोलिस ठाण्यापर्यंत हे संचलन करण्यात आले.

Web Title: Polling in the district today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.