डाळिंब उत्पादकच बनणार आता निर्यातदार! दुप्पट-तिप्पट लाभ : व्यापाऱ्याला न देता स्वत:च करणार विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2018 11:31 PM2018-09-13T23:31:39+5:302018-09-13T23:32:28+5:30

डाळिंबातून चांगले पैसे मिळतात म्हणून शेतकरी बागा करतात; परंतु व्यापाºयांना डाळिंब देण्याने चार पैसे कमी मिळतात.

 Exporters to become pomegranate growers! Double-triple profit: Selling yourself without trading | डाळिंब उत्पादकच बनणार आता निर्यातदार! दुप्पट-तिप्पट लाभ : व्यापाऱ्याला न देता स्वत:च करणार विक्री

डाळिंब उत्पादकच बनणार आता निर्यातदार! दुप्पट-तिप्पट लाभ : व्यापाऱ्याला न देता स्वत:च करणार विक्री

googlenewsNext
ठळक मुद्देसातारा जिल्ह्यातील शेतकरी होणार आर्थिक सक्षम

नितीन काळेल।
सातारा : डाळिंबातून चांगले पैसे मिळतात म्हणून शेतकरी बागा करतात; परंतु व्यापाºयांना डाळिंब देण्याने चार पैसे कमी मिळतात. त्यासाठी शेतकºयांनी स्वत: निर्यातदार व्हावे, यासाठी सातारा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने त्यासाठी पाऊल उचलले असून, त्यांच्या माध्यमातून शेतकºयांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. या मार्गदर्शनातून शेतकºयांना निर्यातदार होता येणार असून, व्यापाºयाला फळे न देण्याने दुप्पट, तिप्पट पैसे मिळणार आहेत.

सातारा जिल्ह्यातील माण, खटाव, फलटण, कोरेगाव या तालुक्यांत डाळिंबाचे क्षेत्र अधिक आहे. अनेक शेतकरी पूर्णपणे डाळिंब पिकांवर अवलंबून आहेत. सध्या जिल्ह्यात सुमारे साडेतीन हजार हेक्टर क्षेत्रावर डाळिंब घेतले जात आहे. अनेक शेतकºयांचे डाळिंब युरोप, आखाती देशात निर्यात होत आहे; पण हे डाळिंब व्यापाºयांच्या माध्यमातून जात आहे. त्यामुळे शेतकºयांच्या हाती चांगला दर लागत नाही. त्यासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने डाळिंब उत्पादक शेतकºयांसाठी एक पाऊल उचलले आहे. या कार्यालयाने जिल्ह्यातील १०० शेतकºयांना डाळिंब उत्पादनाविषयी मार्गदर्शन करण्याचे ठरविले आहे. या माध्यामातून शेतकºयांना डाळिंबाचे व्यवस्थापन, खते, औषधे यांचे प्रमाण, कागदपत्रे, पत्रव्यवहार, डाळिंब निर्यात करायचे असेल तर त्याच्या अटी, नियम काय आहेत, याविषयी मार्गदर्शन करण्यात येत आहे.

बाहेरील देशात डाळिंब निर्यात करायचे झाल्यास त्याचे वजन हे २५० ग्रॅमच्या पुढे असणे आवश्यक आहे. ते कीडरोग मुक्त व कीडनाशक उर्वरित अंश विरहित असणेही गरजेचे आहे. असे डाळिंब कंटेनरमधून पाठविली जातात. एका कंटेनरमध्ये साधारणपणे १२ ते २० टन डाळिंब बसतात. त्याची वाहतूक तीन ते पाच डिग्री सेल्सिअस अंशामध्ये केली जाते, अशी माहिती डाळिंब उत्पादक शेतकºयांना मिळाली तर ते आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील.

व्यापाºयांचा हस्तक्षेप नसणार...
जिल्ह्यातील शेतकरी डाळिंब बाजारात आपला माल घेऊन जातात. तेथे व्यापारी खरेदी करतात. त्यावेळी व्यापारी म्हणेल तो दर असतो. तर काही व्यापारी शेतकºयांच्या बांधावर येऊन डाळिंब घेऊन जातात. चांगला माल व्यापारी बाहेरील देशात निर्यात करतात. माल शेतकºयांचा; पण फायदा व्यापाºयांचा होतो. त्यातून व्यापाºयांनाच अधिक पैसे मिळतात. शेतकºयांनी स्वत:च माल निर्यात केला तर दुप्पट, तिप्पट अधिक पैसे मिळणार आहेत. त्यातून शेतकºयांचे आर्थिक जीवनमान अधिक उंचावणार आहे. तर सातारा जिल्ह्यात सध्या हजारो शेतकरी डाळिंब घेतात. त्यांना यामुळे अधिक पैसे मिळणार आहेत. एकंदरीतच शेतकºयांच्या जीवनामध्ये आर्थिक क्रांती येण्यास मदत होणार आहे.

Web Title:  Exporters to become pomegranate growers! Double-triple profit: Selling yourself without trading

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.