आंबेनळी घाटातील अपघातात चालक, क्लिनर गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2019 04:14 PM2019-01-02T16:14:25+5:302019-01-02T16:16:49+5:30

महाबळेश्वर राज्य मार्गावरील आंबेनळी घाटात ६० फूट खोल दरीत ट्रक कोसळल्याची दुर्देवी घटना बुधवारी पहाटे घडली. यामध्ये चालक आणि क्लिनर गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर पोलादपूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Driver and cleaner injured seriously in a collision between the affluent Ghat | आंबेनळी घाटातील अपघातात चालक, क्लिनर गंभीर जखमी

आंबेनळी घाटातील अपघातात चालक, क्लिनर गंभीर जखमी

Next
ठळक मुद्देआंबेनळी घाटातील अपघातात चालक, क्लिनर गंभीर जखमी६० फूट खोल दरीत ट्रक कोसळला; ट्रकचा चक्काचूर

सातारा: महाबळेश्वर राज्य मार्गावरील आंबेनळी घाटात ६० फूट खोल दरीत ट्रक कोसळल्याची दुर्देवी घटना बुधवारी पहाटे घडली. यामध्ये चालक आणि क्लिनर गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर पोलादपूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पोलादपूरहून ट्रक महाबळेश्वरकडे येत होता. बावळी गावच्या हद्दीत चालकाचा ताबा अचानक सुटल्याने हा ट्रक सुमारे ६० फूट दरीत कोसळला. दाट झाडीमध्ये ट्रक अडकला गेला. ट्रकचा अक्षरश: चक्काचूर झाला. हा अपघात झाल्यानंतर इतर वाहन चालकांनी याची माहिती महाबळेश्वर आणि पोलादपूर पोलिसांना दिली.

घाटातून ये-जा करणाऱ्या वाहन चालक तसेच नागरिकांनी दरीत उतरून जखमींना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, ट्रकच्या केबीनमध्ये दोघेही अडकल्याने त्यांना बाहेर काढणे अवघड झाले होते.

महाबळेश्वर ट्रेकर्सच्या जवानांना अखेर या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. दरीत उतरून दोघांनाही बाहेर काढले. त्यानंतर रुग्णालयात हलविले. चालक आणि क्लिनरची ओळख पटविण्याचे काम पोलिसांकडून सुरू होते.

Web Title: Driver and cleaner injured seriously in a collision between the affluent Ghat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.