Lok Sabha Election 2019 राज्यातील सहकार क्षेत्र उद्ध्वस्त करण्याचा डाव: शिवेंद्र्रसिंहराजे भोसले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2019 10:56 PM2019-04-15T22:56:07+5:302019-04-15T22:56:26+5:30

सातारा : ‘केंद्र, राज्यातील सरकारच्या मनमानी धोरणांमुळे व्यापारी, शेतकरी, नोकरदार, सर्वसामान्य जनता सुखी नाही. या सरकारने नोटा बंदीचा निर्णय ...

Disrupting cooperative sector in the state: Shivendra Rasheraj Bhosale | Lok Sabha Election 2019 राज्यातील सहकार क्षेत्र उद्ध्वस्त करण्याचा डाव: शिवेंद्र्रसिंहराजे भोसले

Lok Sabha Election 2019 राज्यातील सहकार क्षेत्र उद्ध्वस्त करण्याचा डाव: शिवेंद्र्रसिंहराजे भोसले

Next

सातारा : ‘केंद्र, राज्यातील सरकारच्या मनमानी धोरणांमुळे व्यापारी, शेतकरी, नोकरदार, सर्वसामान्य जनता सुखी नाही. या सरकारने नोटा बंदीचा निर्णय घेतला, त्यामुळे देशाचे अर्थकारण बदलले. सुरळीत चाललेल्या बँका अडचणीत येण्याची चिन्हे निर्माण झाली. सहकार क्षेत्र कोलमडून टाकण्याचा आणि अडचणीत आणण्याचा प्रयत्न झाला,’ असा आरोप आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केला.
लिंबखिंड-पानमळेवाडी येथे आयोजित लिंब व शाहूपुरी जिल्हा परिषद गटातील पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकऱ्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी खासदार उदयनराजे भोसले, अजिंक्यतारा साखर कारखान्याचे चेअरमन सर्जेराव सावंत, पंचायत समितीचे सभापती मिलिंद कदम, उपसभापती जितेंद्र्र सावंत, संजय पाटील, बाळासाहेब गोसावी, प्रल्हाद चव्हाण, नंदाभाऊ जाधव उपस्थित होते.
शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, ‘जीएसटीसारख्या निर्णयामुळे वेगळाच पेच प्रसंग निर्माण झाला आहे. जास्तीत जास्त रोजगार उपलब्ध करणारे बांधकाम क्षेत्र रेराच्या अंबलबजावणीमुळे अडचणीत आले आहे. त्यामुळे सर्वांना त्रासदायक ठरणारे हे सरकार हटविण्याचा निर्धार या निवडणुकीत करू या.’
खासदार उदयनराजे म्हणाले, ‘आपला बहुमोल वेळ वादावादीत वाया घालवू नका. कारण वेळ एकदा गेली की पुन्हा ती आणू शकत नाही. वेळ सत्कारणी लावण्यासाठी कायमस्वरुपी गैरसमज ठेवू नका. त्यातून आपणा सर्वांचाच तोटा होतो आणि नको त्यांचा फायदा होतो. गांधीजींनी देशाला लोकशाहीचा मंत्र दिला आणि पंचायत राज संकल्पनेतून सत्तेच्या विकेंद्रीकरणाचे तत्त्व सांगितले; मात्र जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारतात सध्या सत्तेच्या केंद्र्रीकरणाचा डाव रचला जात आहे. हा देश लोकशाहीतील राजांचा आहे की उद्योगपती अंबानी, अदानी अशा भांडवलदारांचा? असा प्रश्न निर्माण व्हावा, अशी विचित्र स्थिती निर्माण झाली आहे. नैसर्गिक गॅस, वायू, पाणी या राष्ट्रीय संपत्तीचे मालकी हक्क ठराविक उद्यागपतींना देऊन त्यांच्याकडून जनतेने ते विकत घेण्याची वेळ आली आहे.’
यावेळी बाळासाहेब गोसावी, किरण साबळे-पाटील, धर्मराज घोरपडे, तात्या वाघमळे यांचीही भाषणे झाली. सभेस जिल्हा परिषदेच्या सदस्या अनिता चोरगे, पंचायत समितीच्या सदस्या सरिता इंदलकर, वसुंधरा ढाणे, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा समिंद्र्रा जाधव, राजेंद्र लवंगरे, आनंदा नलवडे उपस्थित होते.

Web Title: Disrupting cooperative sector in the state: Shivendra Rasheraj Bhosale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.