वीज वाहिनीचे संकट सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसमोर उभे, पिकांना स्पर्श

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 01:15 PM2017-12-11T13:15:25+5:302017-12-11T13:19:56+5:30

वीजवितरण कंपनी कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे येथील शेतकऱ्यांचा मृत्यू काही फूट अंतरावर आलेला आहे. कारण, वीज वाहिनीच्या रुपाने हे संकट या परिसरातील शेतकऱ्यांच्या पुढे आहे. वीजतारा खाली आल्या असून, पिकांना स्पर्श होऊ लागला आहे. हे संकट कधीही शेतकऱ्यांच्या समोर येऊ शकते. या संकटामुळे वीज कंपनीला जाग येणार का? असा सवाल येथील शेतकरी करू लागले आहेत.

The crisis of the electricity channel stands before farmers in Satara, touching crops | वीज वाहिनीचे संकट सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसमोर उभे, पिकांना स्पर्श

वीज वाहिनीचे संकट सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसमोर उभे, पिकांना स्पर्श

Next
ठळक मुद्देवीज कंपनीला जाग येणार का? परिसरातील शेतकऱ्यांचा सवाल वीजतारा खाली आल्या, पिकांना स्पर्श रात्रीच्यावेळी पाणी देताना धोका वाढला

उंब्रज : वीजवितरण कंपनी कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे येथील शेतकऱ्यांचा मृत्यू काही फूट अंतरावर आलेला आहे. कारण, वीज वाहिनीच्या रुपाने हे संकट या परिसरातील शेतकऱ्यांच्या पुढे आहे. वीजतारा खाली आल्या असून, पिकांना स्पर्श होऊ लागला आहे. हे संकट कधीही शेतकऱ्यांच्या समोर येऊ शकते. या संकटामुळे वीज कंपनीला जाग येणार का? असा सवाल येथील शेतकरी करू लागले आहेत.

येथील उंब्रज-चोरे रस्त्यानजीक सोरजाई मळा आहे. येथील शेतीतून पाल फिडरची वीज वाहिनी गेलेली आहे. या वाहिनीचा ताण काढण्यात आलेला नाही. त्यामुळे तारा कमी उंचीवर आलेल्या आहेत.

या तारा एवढ्याखाली आलेल्या आहेत की, माणसांच्या उंचीपासून काही फूट अंतरावर त्या दिसत आहेत. शेतातील पिकांना घासत आहेत. यामुळे शॉर्टसर्किट होऊन पिके जळण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर या परिसरातील शेतकरी, त्यांच्या जनावरांनाही धोका निर्माण झाला आहे.

Web Title: The crisis of the electricity channel stands before farmers in Satara, touching crops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.