सायकल बिल्डिंगखाली लावली म्हणून पित्रा-पुत्राने केली एकाची हत्या; गिरगावात धक्कादायक प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2024 06:31 PM2024-05-03T18:31:40+5:302024-05-03T18:41:01+5:30

Crime News : क्षुल्लक कारणावरुन झालेल्या वादातून गिरगावात एका व्यक्तीची हत्या करण्यात आलीय.

Mumbai Crime News One killed in a dispute over a bicycle parinking in Girgaon | सायकल बिल्डिंगखाली लावली म्हणून पित्रा-पुत्राने केली एकाची हत्या; गिरगावात धक्कादायक प्रकार

(प्रातिनिधीक छायाचित्र)

Mumbai Crime : मुंबईच्या गिरगाव परिसरातून अतिशय धक्कादायक बातमी समोर आली आहे. गिरगावमध्ये सायकलवरून झालेल्या वादातून एका व्यक्तीची हत्या करण्यात आल्याने खळबळ उडालीय. या हत्येप्रकरणी व्ही. पी. रोड पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी पिता-पुत्राला अटक करण्यात आली आहे. सायकल लावण्याच्या वादातून झालेल्या ५५ वर्षीय व्यक्तीची हत्या झाल्याने सध्या गिरगावात हा विषय चर्चेचा ठरत आहे. पोलीस याप्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

गिरगावच्या मुगभाट लेनमधील पारिजात सदन परिसरात ही घटना घडली. मुकेश मोरजकर (५५) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. मुकेश मोरजकर यांचा मुलगा त्यांच्या बिल्डिंगच्या खालीच सायकल उभी करतो. मात्र सायकल बिल्डिंगखाली उभी करण्यावरुन मुकेश मोरजकर आणि विपुल राऊत (३२) व विकास राऊत (६२) यांच्यात गुरुवारी जोरदार वाद झाला. या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. विपुल आणि विकास राऊत यांनी मुकेश मोरजकर यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर त्यांचे डोके भींतीवर आपटले. या मारहाणीनंतर मोरजकर हे खाली कोसळले. त्यामुळे त्यांना तत्काळ जीटी रुग्णालयात दाखल करण्यात आले.मात्र डॉक्टरांनी तपासणी करताच मोरजकर यांना मृत घोषित केले.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊ याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मात्र, मोरजकर यांच्या पत्नी मोहिनी मोरजकर यांनी व्हीपी रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. मोहिनी मोरजकर यांनी दिलेल्या फिर्यादीमध्ये राऊत पिता-पुत्रांनी पतीला मारहाण केल्याचे म्हटले आहे. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी गुरुवारी मध्यरात्री विकास आणि विपुल या दोघांना त्यांच्या राहत्या घरातून अटक केली.

Web Title: Mumbai Crime News One killed in a dispute over a bicycle parinking in Girgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.