चुका केलात आता दुरुस्त्याही करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2018 11:50 PM2018-01-07T23:50:47+5:302018-01-07T23:51:28+5:30

Correct the mistakes even now | चुका केलात आता दुरुस्त्याही करा

चुका केलात आता दुरुस्त्याही करा

googlenewsNext


फलटण : ‘शेती पंपाची बिले देताना चुका तुम्ही केल्या, दुरुस्त्याही तुम्हीच करून द्या, त्यासाठी शेतकºयांना हेलपाटे मारायला लावू नका, शेतीपंपाची प्रलंबित मागणी तातडीने पूर्ण करा, ट्रान्सफार्मर नादुरुस्त झाल्यानंतर तेथे तातडीने दुसरा ट्रान्सफार्मर बसवून द्या,’ अशा सूचना सहपालक मंत्री सदाभाऊ खोत यांनी दिले.
फलटण तालुक्यातील तडवळे येथे साखरवाडी, हिंगणगाव, सासवड जिल्हा परिषद गटांतील शासन आपल्या दारी योजनेंतर्गत आयोजित आढावा बैठकीत अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी कृष्णा खोरे महामंडलाचे माजी उपाध्यक्ष रणजिसिंह नाईक-निंबाळकर, रयत क्रांती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सुरेश पाटील, दीपक भोसले, सागर खोत, बाजार समितीचे संचालक अमोल खराडे, सिराज शेख, राजेंद्र काकडे, प्रांताधिकारी संतोष जाधव, गटविकास अधिकारी विजयसिंह जाधव, तालुका कृषी अधिकारी गोरखनाथ डोईफोडे, उपअभियंता महादेव पाटील उपस्थित होते.
मंत्री खोत म्हणाले, ‘वीजबिल दुरुस्ती किंवा रीडिंग न घेतल्याने एकदम आलेली वीजबिले दुरुस्त करून देण्याचे काम वीजवितरण कंपनीचे अधिकारी त्या गावात जाऊन करतील. संबंधित अधिकाºयांनी गावात जाऊन ग्रामपंचायत कार्यालयात बिले दुरुस्त करून द्यावीत. वीज संंबंधीच्या तक्रारी तेथेच दूर कराव्यात.’
तालुक्यात सुमारे सत्तर ट्रान्सफर्मर जळाल्याचे अधिकाºयांनी सांगताच तीव्र संताप व्यक्त करीत मंत्री खोत म्हणाले, ‘नद्या, नाले, विहिरीत सध्या पाणी आहे. शेतात पिके उभी आहेत. चारा पिकांसाठी पाणी आवश्यक असताना एवढे ट्रान्सफार्मर नादुरुस्त होतात. आणि त्याठिकाणी दुसरे ट्रान्सफार्मर बसविताना विजेची थकबाकी भरण्याची तंबी शेतकºयाला दिली जाते हे अवाजवी आहे. कृषी संजीवनी योजनेंतर्गत एकदा हप्ते ठरवून दिल्यानंतर पुन्हा थकबाकीसाठी शेतकºयांची अडवणूक सहन करणार नाही.’
महाराष्ट्र शेती महामंडळाकडील खंडकºयांना त्यांच्या मूळ जमिनी पाटपाण्याच्या हक्कासह परत करण्याचा निर्णय झाल्यानंतरही अद्याप अनेक खंडकरी शेतकºयांना जमिनी मिळाल्या नाहीत. काहींना खराब व नापिक जमिनी दिल्या आहेत. त्याचबरोबर एक एकरापेक्षा कमी क्षेत्र मिळणार असलेल्या खंडकºयांना न्याय मिळाला नसल्याबद्दल प्रांताधिकारी यांना सविस्तर अहवाल तयार करून देण्याच्या सूचना खोत यांनी बैठकीतच दिल्या.

Web Title: Correct the mistakes even now

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.