साताऱ्यात आणखी एका कामगाराचा इमारतीवरून पडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2019 10:57 AM2019-04-27T10:57:01+5:302019-04-27T10:58:07+5:30

गेल्या आठवड्यात गुरुवार बागेजवळ इमारतीवरून पडून कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच शुक्रवारी साताऱ्यात आणखी एका कामगाराचा इमारतीवरून पडून मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली.

Another worker died in Satara due to his death | साताऱ्यात आणखी एका कामगाराचा इमारतीवरून पडून मृत्यू

साताऱ्यात आणखी एका कामगाराचा इमारतीवरून पडून मृत्यू

googlenewsNext
ठळक मुद्देसाताऱ्यात आणखी एका कामगाराचा इमारतीवरून पडून मृत्यूदुसऱ्यांदा घटना घडल्याने कामगारांमध्ये अस्वस्थता

सातारा : गेल्या आठवड्यात गुरुवार बागेजवळ इमारतीवरून पडून कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच शुक्रवारी साताऱ्यात आणखी एका कामगाराचा इमारतीवरून पडून मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली.

नारायण नरोत्तम धुर्वे (वय ३९, मूळ रा. छत्तीसगड, सध्या रा. विलासपूर, सातारा) असे इमारतीवरून पडून मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी, गेल्या काही दिवसांपासून सदर बझार येथील कुपर कॉलनीमध्ये एका इमारतीचे बांधकाम सुरू आहे.

या बांधकामावर नारायण धुर्वे हे काम करत होते. शुक्रवारी दुपारी काम करत असताना अचानक त्यांचा तोल गेला. ते खाली पडल्यानंतर त्यांच्या डोक्याला आणि मानेला गंभीर जखम झाली. हा प्रकार घडल्यानंतर इतर कामगारांनी त्यांना तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.

दरम्यान, अशाच प्रकारची घटना गेल्या आठवड्यात साताºयातील गुरुवार बागेजवळही घडली होती. इमारतीवर काम करत असताना तोल जाऊन रवी भिकू चव्हाण (वय ३२, रा. शाहूपुरी सातारा) या कामगाराचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आता दुसऱ्यांदा ही घटना घडल्याने कामगारांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.

Web Title: Another worker died in Satara due to his death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.