Sangli: उन्हाच्या तीव्रतेमुळे बाष्पीभवनाचा वेग वाढला; चांदोली धरणात उरले फक्त 'इतके' टीएमसी पाणी 

By संतोष भिसे | Published: April 4, 2024 03:55 PM2024-04-04T15:55:17+5:302024-04-04T15:57:40+5:30

विकास शहा शिराळा : चांदोली (ता. शिराळा) येथील धरणातून वीजनिर्मिती तसेच सिंचनासाठी गेल्या सहा महिन्यांत १६.३४ टीएमसी पाण्याचा वापर ...

The intensity of the heat increased the rate of evaporation; Only 11 TMC of water is left in Chandoli dam sangli | Sangli: उन्हाच्या तीव्रतेमुळे बाष्पीभवनाचा वेग वाढला; चांदोली धरणात उरले फक्त 'इतके' टीएमसी पाणी 

Sangli: उन्हाच्या तीव्रतेमुळे बाष्पीभवनाचा वेग वाढला; चांदोली धरणात उरले फक्त 'इतके' टीएमसी पाणी 

विकास शहा

शिराळा : चांदोली (ता. शिराळा) येथील धरणातून वीजनिर्मिती तसेच सिंचनासाठी गेल्या सहा महिन्यांत १६.३४ टीएमसी पाण्याचा वापर झाला आहे. आतापर्यंत क्षमतेच्या सुमारे ५० टक्के पाणीधरणातून सोडण्यात आले आहे. 

सध्याचा धरणातील साठा गतवर्षीच्या एप्रिलपेक्षा ५ टीएमसीने कमी आहे. सध्या फक्त वीजनिर्मिती केंद्रातून १३९० क्यूसेक क्षमतेने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. कालव्यात ६५०, तर नदीत १०४० क्यूसेकने विसर्ग सुरू आहे. धरणात फक्त ११.१८ टीएमसी (४०.६१ टक्के) उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे.

पावसाने उघडीप दिल्याने ३ ऑक्टोबरलाच दरवाजे बंद करण्यात आले होते. यानंतर फक्त वीजनिर्मिती केंद्रातून विसर्ग सुरू होता. ३ ऑक्टोबर ते ३ एप्रिलदरम्यान १६.३४ टीएमसी पाणीसाठा कमी झाला आहे. धरणाची ३३.४० टीएमसी असून उपयुक्त साठा ११.१८ टीएमसी (४०.६१ टक्के) आहे. एकट्या मार्च महिन्यातच ३.७६ टीएमसी पाणी कमी झाले आहे. यंदा उन्हाच्या तीव्रतेमुळे बाष्पीभवनाचा वेग वाढला आहे.

मोरणा धरणात २१ टक्के, कार्वे व रेठरे धरणांत २० टक्के पाणीसाठा आहे. शिराळा तालुक्यातील १२ पाझर तलाव कोरडे पडले आहेत, तर २७ तलावांत २५ ते ३० टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. ९ तलावांत ४० ते ५० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

चांदोली धरणाची ४ एप्रिलरोजीची स्थिती

 - क्षमता : ३४.४० टीएमसी
- साठा : १८.०६ टीएमसी (५२.४९ टक्के)
- उपयुक्तसाठा : ११.१८ टीएमसी (४०.६१ टक्के)
- एकूण पाऊस - १८८९ मिलिमीटर
- वीजनिर्मिती केंद्रातून विसर्ग : १३९०क्यूसेक
- यापैकी कालव्यातून : ३५० क्यूसेक
- नदीपात्रात : १०४० क्यूसेक

Web Title: The intensity of the heat increased the rate of evaporation; Only 11 TMC of water is left in Chandoli dam sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.