सांगली : साहित्य संमेलनाच्या मंडप उभारणीस औदुंबरात प्रारंभ, यंदाचे साहित्य संमेलन १२ जानेवारीपासून तीन दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2018 05:03 PM2018-01-08T17:03:08+5:302018-01-08T17:09:13+5:30

औदुंबर (ता. पलूस) येथे १२ जानेवारीपासून सुरु होणाऱ्या सदानंद साहित्य मंडळाच्या ७५ व्या साहित्य संमेलनाच्या मंडप उभारणीचा प्रारंभ अंकलखोपचे सरपंच अनिल विभुते यांच्याहस्ते झाला. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक सुभाष कवडे, मंडळाचे उपाध्यक्ष शहाजी सूर्यवंशी, माजी उपसरपंच हणमंत पाटील, विशाल सूर्यवंशी, कार्यवाह पुरुषोत्तम जोशी, माधवराव सूर्यवंशी, त्रिलोकनाथ जोशी, गिरीश जोशी उपस्थित होते.

Sangli: Three days from 12th January, this year's Literature will be organized in Sangli. | सांगली : साहित्य संमेलनाच्या मंडप उभारणीस औदुंबरात प्रारंभ, यंदाचे साहित्य संमेलन १२ जानेवारीपासून तीन दिवस

सांगली : साहित्य संमेलनाच्या मंडप उभारणीस औदुंबरात प्रारंभ, यंदाचे साहित्य संमेलन १२ जानेवारीपासून तीन दिवस

Next
ठळक मुद्देपद्मश्री कवी सुधांशु यांची जन्मशताब्दी१२ जानेवारीपासून अमृतमहोत्सवी साहित्य संमेलनमोठ्या संख्येने रसिक येणार सर्व पातळीवर जोरदार तयारी सुरू

अंकलखोप : औदुंबर (ता. पलूस) येथे १२ जानेवारीपासून सुरु होणाऱ्या सदानंद साहित्य मंडळाच्या ७५ व्या साहित्य संमेलनाच्या मंडप उभारणीचा प्रारंभ अंकलखोपचे सरपंच अनिल विभुते यांच्याहस्ते झाला.

यावेळी ज्येष्ठ साहित्यिक सुभाष कवडे, मंडळाचे उपाध्यक्ष शहाजी सूर्यवंशी, माजी उपसरपंच हणमंत पाटील, विशाल सूर्यवंशी, कार्यवाह पुरुषोत्तम जोशी, माधवराव सूर्यवंशी, त्रिलोकनाथ जोशी, गिरीश जोशी उपस्थित होते.

पद्मश्री कवी सुधांशु यांची जन्मशताब्दी व अमृतमहोत्सवी साहित्य संमेलन असल्याने यंदाचे साहित्य संमेलन औदुंबर (ता. पलूस) येथे तीन दिवस होणार आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाप्रमाणे साहित्य, कला, सामाजिक, राजकीय, विविध क्षेत्रातील नामवंत हजेरी लावणार आहेत.

त्यामुळे तीन दिवसात विविध सत्रात साहित्य रसिकांना साहित्य व कलागुणांची मेजवानी मिळणार आहे. जिल्ह्यातून तसेच राज्यातून येणाऱ्या साहित्यिकांची राहणे, भोजन व अल्पोपहाराची मोफत व उत्तम व्यवस्था केली जाणार आहे. यासाठी संयोजकांकडून जोरदार प्रारंभ करण्यात आला आहे.

जोरदार तयारी सुरू

मोठ्या संख्येने रसिक येणार असल्यामुळे सर्व पातळीवर जोरदार तयारी सुरू आहे. अंकलखोप ग्रामपंचायत व सदानंद साहित्य मंडळाचे पदाधिकारी व ग्रामस्थ संयोजन करीत आहेत.

Web Title: Sangli: Three days from 12th January, this year's Literature will be organized in Sangli.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.