कृष्णाकाठचे औदुंबर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2017 12:47 AM2017-12-02T00:47:02+5:302017-12-02T00:47:23+5:30

कृष्णेचं पात्र जलानं काठोकाठ भरलेलं. अवघा परिसर भाव भक्तीनं भारलेला! दूरवर निळंशार आकाश पसरलेलं! पैलतीर हिरव्यागार शेतीनं तरारलेलं! ऐलतीरावर भगवान दत्तात्रयांचं वसतिस्थान. मनोहर पादुका भक्तांना भावणा-या. दगडी पाय-यांचा देखणा घाट.

 Oudomar of Krishna Katha | कृष्णाकाठचे औदुंबर

कृष्णाकाठचे औदुंबर

Next

- कौमुदी गोडबोले

कृष्णेचं पात्र जलानं काठोकाठ भरलेलं. अवघा परिसर भाव भक्तीनं भारलेला! दूरवर निळंशार आकाश पसरलेलं! पैलतीर हिरव्यागार शेतीनं तरारलेलं! ऐलतीरावर भगवान दत्तात्रयांचं वसतिस्थान. मनोहर पादुका भक्तांना भावणा-या. दगडी पाय-यांचा देखणा घाट. औदुंबर मोठा भाग्यवान! या वृक्षाच्या तळवटी श्रीनृसिंह सरस्वती स्वामी म्हणजेच दत्तगुरूंचा नित्य वास! त्यामुळे औदुंबर वृक्ष पूजनीय ठरला. शेकडो भक्तांच्या भावपूर्ण सहवासात रमलेला औदुंबर आणि कृष्णा नदीचं पवित्र पात्र दत्तगुरूंच्या शक्तीनं संपन्न झालेलं.
शांतता, स्वच्छता याचा सुरेख संगम झालेलं सुंदर स्थान! श्री गुरूंवर दृढ-श्रद्धा असलेला वर्ग! कृष्णेच्या जलाप्रमाणे प्रवाहित होणारी भक्ती सर्वदूर पोचलेली! प्रखर निष्ठेनं, नेमस्तपणानं, नि:स्पृहतेनं या स्थानाला आगळं वेगळं महत्त्व लाभलेलं! सदैव सतेजपणाचं वरदान लाभलेली!
सुमारे सात-साडेसात शतकांपासून शक्तिसंपन्न असलेलं वाडी हे स्थान! निवांतपणानं कृष्णाकाठी साधना करण्यास सुयोग्य असलेलं क्षेत्रं. हल्ली अशी स्थानं, क्षेत्रं दुर्मिळ झालेली आहेत. सगळीकडे व्यवसाय, व्यवहाराचा कोरडेपणा आलेला आहे. सर्वत्र गोंधळ दिसून येतो. कृष्णेचं जल स्वच्छ सुंदर असून संथपणानं लोककल्याणाची आस बाळगून समस्त समाजाला सामावून घेण्याच्या क्षमतेनं संपन्न आहे.
साडेसातशे वर्षांपूर्वी ज्या घराण्यावर दत्तगुरूंनी कृपा केली त्यांचे वंशज आजही श्रद्धा, निष्ठा ठेवून श्रीगुरू दत्तगुरूंच्या भक्तीमध्ये रममाण झालेले दिसून येतात. कृपेचा चांदण वर्षाव झालेल्या भक्तांमुळे हल्लीच्या काळातही भक्तीमधील शक्तीचा प्रत्यय येत आहेत. दत्तभक्ती, नृसिंह सरस्वती स्वामींच्या कथा या काल्पनिक नसून खºया आहेत याची साक्ष देणारी घराणी, त्यांचे वंशज उभे आहेत. नितांत नितळ असणारी भक्ती हल्लीच्या धकाधकीच्या, तणावाच्या स्पर्धेच्या काळातही माणसाला उभं राहण्याचं बळ प्रदान करते.
कृष्णा, पंचगंगा नद्यांचा आणि दत्तगुरूंचा जवळचा संबंध! समृद्ध परिसर, दत्तगुरूंच्या चरणाचा परिसस्पर्श लाभलेलं स्थान! पवित्र स्पंदनांची अनुभूती प्राप्त झाल्यानं चैतन्याचा परिमल मना-मनाभोवती दरवळत राहतो. चंदन उगाळलं की सुगंध येणारच! हा सुगंध जीवनाला लाभला की अवघं जीवन ऊर्जेनं उजळून उठणार यात शंका नाही.

Web Title:  Oudomar of Krishna Katha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.