मारहाणीतील छायाचित्रे निवडणुकीत नाही वापरली : सदाभाऊ खोत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2018 11:54 PM2018-09-07T23:54:42+5:302018-09-07T23:54:46+5:30

The photographs of the assault were not used in elections: Sadbhau Khot | मारहाणीतील छायाचित्रे निवडणुकीत नाही वापरली : सदाभाऊ खोत

मारहाणीतील छायाचित्रे निवडणुकीत नाही वापरली : सदाभाऊ खोत

Next

कसबे डिग्रज : गेली पस्तीस वर्षे शेतकरी चळवळीत काम केले आहे. तरूंगवास झाला, कितीतरी वेळा रस्त्यावर उतरलो, मारहाणही झाली, रक्त सांडले. पदयात्रेत पायांना फोड आले, पण मी त्याची छायाचित्रे काढून निवडणुकीत सहानुभूती मिळविली नाही. शेतकऱ्यांच्या आशीर्वादानेच मंत्री झालो आणि यांच्या पोटात दुखू लागले, अशी टीका कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी खा. राजू शेट्टी यांचे नाव न घेता केली. मुख्यमंत्र्यांनी सांगितले तर हातकणंगलेतून निवडणूक लढविणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.
तुंग (ता. मिरज) येथे पेयजल योजनेतून नळपाणी पुरवठा योजनेच्या ४ कोटी ३८ लाखांच्या कामांचा प्रारंभ सदाभाऊ खोत, इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील, जिल्हा परिषद सदस्या सुरेखा आडमुठे, पंचायत समिती सदस्या जयश्री डांगे यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी खोत म्हणाले की, कृषिमंत्री झाल्यापासून बाजार समितीत शेतकºयांना मतदान, शेतीमालाच्या आधारभूत किमतीत वाढ, ऊस दरात वाढ आणि स्वामीनाथन् आयोग लागू करण्यास पाठपुरावा केला आहे. हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील पाणी योजनांसाठी २२५ कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आहे. सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील १७६ पाणी योजनांचा पाठपुरावा करून, त्यांच्या निधीसाठी मंत्रीपद वापरत आहे. मुख्यमंत्र्यांनी आदेश दिला, तर हातकणंगले या घरच्या मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढविणार आहे.
वसंतदादा साखर कारखान्याचे माजी संचालक सचिन डांगे म्हणाले की, तुंग गाव विकास कामांना साथ देणारे आहे. तुंग-बागणी योजना कालबाह्य होऊन पाणी योजनेसाठी अनेक वर्षे पाठपुरावा सुरू होता. पण सदाभाऊंनी योजना मंजूर करून निधी दिला आहे.
यावेळी विशाल शिंदे, माजी सरपंच पाटील, उपसरपंच विलास डांगे यांचीही भाषणे झाली.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य भीमराव माने, सरपंच शहाजी लतिफ, विलास डांगे, सुधाकर पाटील, सागर खोत, आशाराणी नांद्रे, राहुल डांगे, सुकुमार चौगुले, आनंदा दळवी, महादेव नलवडे, गजानन दळवी, प्रसाद पाटील, सुधीर गोंधळी उपस्थित होते.
‘त्यांना’ थारा नको
निशिकांत पाटील म्हणाले की, १५ वर्षे मंत्री असणाºयांनी काय केले? वाळवा तालुक्यात नुसत्या विकासाच्या गप्पा मारल्या, म्हणून ३१ वर्षांनी परिवर्तन झाले. मिरज पश्चिम भाग हुशार आहे. माजी मंत्र्यांना पाच वर्षातच ओळखले आहे. आता त्यांना थारा देऊ नका.

Web Title: The photographs of the assault were not used in elections: Sadbhau Khot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.