सांगलीत अटलजींच्या अस्थींचे कृष्णा-वारणेच्या पवित्र संगमावर विसर्जन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2018 06:13 PM2018-08-24T18:13:57+5:302018-08-24T18:19:54+5:30

माजी पंतप्रधान आणि भारतरत्न अटबिहारी वाजपेयी यांच्या अस्थींचे शुक्रवारी हरिपूर येथील कृष्णा-वारणा नदीच्या पवित्र संगमात विसर्जन करण्यात आले. " अटलजी अमर रहे " च्या घोषणांनी परिसर दुमदुमला.

Immersion on the holy Sangam of Sangliat Atalji's bone of Krishna-Varna | सांगलीत अटलजींच्या अस्थींचे कृष्णा-वारणेच्या पवित्र संगमावर विसर्जन

सांगलीत अटलजींच्या अस्थींचे कृष्णा-वारणेच्या पवित्र संगमावर विसर्जन

googlenewsNext
ठळक मुद्देसांगलीत अटलजींच्या अस्थींचे कृष्णा-वारणेच्या पवित्र संगमावर विसर्जनअटलजींच्या अस्थीकलशाची दर्शन यात्रा

सांगली : माजी पंतप्रधान आणि भारतरत्न अटबिहारी वाजपेयी यांच्या अस्थींचे शुक्रवारी हरिपूर येथील कृष्णा-वारणा नदीच्या पवित्र संगमात विसर्जन करण्यात आले. " अटलजी अमर रहे " च्या घोषणांनी परिसर दुमदुमला.



सकाळी १० वाजता आमदार सुधीर गाडगीळ यांच्या विश्रामबाग येथील कार्यालयापासून एका सजवलेल्या उघडया वाहनातून अटलजींच्या अस्थीकलशाची दर्शन यात्रा सुरु झाली.



विश्रामबाग चौक, जिल्हा मध्यवर्ती बँक, राम मंदिर चौक, स्टेशन चौक, नगर वाचनालय, बालाजी चौक, मारुती चौक, शास्त्री चौक या मार्गावरून हरिपूरपर्यंत ही अस्थी कलश दर्शन यात्रा संपन्न झाली. वाटेत विविध संस्थाचे पदाधिकारी आणि असंख्य नागरिक बंधू-भगिनींनी पुष्पहार घालून अस्थी कलशाचे दर्शन घेतले.


या दर्शन यात्रेमध्ये आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सुरेश खाडे, जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, निता केळकर, मकरंद देशपांडे, दिनकरतात्या पाटील, शेखर इनामदार, मुन्ना कुरणे, प्रकाश बिरजे, दिपक शिंदे, राजाराम गरुड, संग्रामसिंह देशमुख, रमेश शेंडगे, महापौर संगीता खोत, उपमहापौर धीरज सूर्यवंशी, गटनेते युवराज बावडेकर व सर्व नवनिर्वाचित नगरसेवक उपस्थित होते. 

तसेच हरिपूरचे सरपंच विकास हणबर व सर्व ग्रामपंचायत सदस्य अरविंद तांबवेकर, शोभा कांबळे, सतिश खंडागळे तसेच युवा मोर्चाचे अजिंक्य हंबर, जयगोंड कोरे, धनेश कातगडे, चेतन माडगुळकर, दरीबा बंडगर, अमोल कणसे, राजीव ताम्हनकर, मोहन वाटवे, मोहन व्हनखंडे सर यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. या अस्थी कलश दर्शन यात्रेचे नियोजन भाजप प्रसिद्धी प्रमुख केदार खाडिलकर यांनी केले.

Web Title: Immersion on the holy Sangam of Sangliat Atalji's bone of Krishna-Varna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.