सांगली : कृष्णा-वारणेत होणार उद्या अटलजींच्या अस्थींचे विसर्जन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2018 04:58 PM2018-08-23T16:58:54+5:302018-08-23T17:00:54+5:30

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या अस्थींचे हरिपूर येथील कृष्णा -वारणा संगमावर उद्या, शुक्रवारी विसर्जन करण्यात येणार आहे.

Atalji's immersion of Atalji will be held tomorrow in Krishna-Varanas | सांगली : कृष्णा-वारणेत होणार उद्या अटलजींच्या अस्थींचे विसर्जन

सांगली : कृष्णा-वारणेत होणार उद्या अटलजींच्या अस्थींचे विसर्जन

Next
ठळक मुद्देकृष्णा-वारणेत होणार उद्या अटलजींच्या अस्थींचे विसर्जनजनतेच्या दर्शनासाठी गाडगीळ यांच्या जनसंपर्क कार्यालयात अस्थिकलश

सांगली : माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या अस्थींचे हरिपूर येथील कृष्णा -वारणा संगमावर उद्या, शुक्रवारी विसर्जन करण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब पाटील-दानवे यांनी पालकमंत्री सुभाष देशमुख आणि सांगलीचे भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार सुधीर गाडगीळ यांच्याकडे अटलजींचा अस्थीकलश सुपूर्द केला. मुंबईहुन गुरुवारी अटलजींचा अस्थिकलश सांगलीत आमदार गाडगीळ यांच्या जनसंपर्क कार्यालयात ठेवण्यात आला होता. या अस्थीकलशाचे पूजन आमदार सुधीर गाडगीळ यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी महापौर संगिता खोत, उपमहापौर धीरज सूर्यवंशी, महानगरपालिकेतील गटनेते युवराज बावडेकर, माजी आमदार दिनकरतात्या पाटील, शेखर इनामदार, निताताई केळकर, प्रकाश बिरजे, मकरंद देशपांडे, शरद नलवडे, मुन्ना कुरणे, मोहन व्हनखंडे, मोहन वाटवे, विठ्ठल खोत, नगरसेवक गणेश माळी, प्रकाश ढंग, सोनाली सागरे, कल्पना कोळेकर, संजय कुलकर्णी, विनायक सिंहासने, संदीप आवटी, निरंजन आवटी, आनंदा देवमाने, गायत्री कल्लोळी, सुबाव मद्रासी, सविता मदने, तसेच भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

अटलजींचा अस्थिकलश जनतेच्या दर्शनासाठी शुक्रवारी सकाळी ९ वाजेपर्यंत आमदार सुधीर गाडगीळ यांच्या विश्रामबाग येथील जनसंपर्क कार्यालयात ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर हरिपूर येथील कृष्णा-वारणा नदीच्या पवित्र संगमावर या कलशातील अस्थींचे विसर्जन करण्यात येणार आहे.

यावेळी जिल्हाचे  खासदार, आमदार, महानगर पालिकेचे महापौर, उपमहापौर व नगरसेवक,  जिल्हापरिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष व  सदस्य, पंचायत समिती सभापती, उपसभापती व सदस्य, तसेच ग्रामपंचायत सरपंच व सदस्य व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.

Web Title: Atalji's immersion of Atalji will be held tomorrow in Krishna-Varanas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.