Sangli: रेठरे धरण येथे मित्रावर चाकूहल्ला, गंभीर जखमी 

By हणमंत पाटील | Published: March 29, 2024 03:45 PM2024-03-29T15:45:07+5:302024-03-29T15:46:59+5:30

इस्लामपूर पोलीस संशयितांचा शोध घेत आहेत

Due to a fight between friends, one was attacked with a knife at Rethere Dam sangli, seriously injured | Sangli: रेठरे धरण येथे मित्रावर चाकूहल्ला, गंभीर जखमी 

संग्रहित छाया

मानाजी धुमाळ

रेठरे धरण :  रेठरे धरण, ता. वाळवा येथील जिल्हा परिषद शाळा क्रमांक तीन जवळ दोन मित्रांच्या भांडणातून, सनी बापूसो वाघमारे (वय 26) यांचेवर संशयित आधार संजय वाघमारे (वय 23) व त्याचा अल्पवयीन भाऊ या दोघांनी  चाकू हल्ला केला. गंभीर जखमी झाल्याने त्याच्यावर सांगली येथील सरकारी रुग्णालयात उपचार सुरू केले. त्याची प्रकृती गंभीर असून, इस्लामपूर पोलीस संशयितांचा शोध घेत आहेत. ही घटना काल, गुरुवारी रात्रीच्या सुमारास घडली. 

रेठरे धरण येथील जिल्हा परिषद शाळा क्रमांक 3 जवळ सनी बापूसो वाघमारे यांचे घर असून या शाळेजवळ सनी व त्याचा मित्र आधार ऊर्फ पांडू बोलत थांबले होते. त्यावेळी अचानक सनी आणि आधार यांच्यात वादावादी झाली. या वादावादीनंतर  संशयित आधार व त्याचा अल्पवयीन भाऊ या दोघांनी सनीच्या पोटावर चाकू हल्ला केला.  पोटातून रक्तस्त्राव झाला, घटनेनंतर संशयित तेथून निघून गेले. 

सनी वाघमारे यास त्याच्या घरच्यांनी उपचारासाठी इस्लामपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. परंतु पोटात शस्त्रक्रिया करावयास लागत असलेने, सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.  इस्लामपूर पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी घटनास्थळी येऊन सदर घटनेची माहिती घेऊन गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू केली. आज शुक्रवार रोजी गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. या घटनेने  रेठरे धरण येथे खळबळ उडाली असून, पोलिसांनी जबाब घेण्याचे काम सुरू केले आहे.

Web Title: Due to a fight between friends, one was attacked with a knife at Rethere Dam sangli, seriously injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.