आराम बस उलटून ४१ जण जखमी

By admin | Published: July 20, 2016 12:43 PM2016-07-20T12:43:33+5:302016-07-20T12:43:33+5:30

गुरुपौर्णिमेनिमित्त कुंडल (जि. सांगली) येथील धार्मिक कार्यक्रम आटोपून परतणारी आरामबस उलटून ४१ भाविक जखमी झाले.

41 people injured after bus reversed | आराम बस उलटून ४१ जण जखमी

आराम बस उलटून ४१ जण जखमी

Next
style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत 
सांगली, दि. २० - गुरुपौर्णिमेनिमित्त कुंडल (जि. सांगली) येथील धार्मिक कार्यक्रम आटोपून परतणारी आरामबस उलटून ४१ भाविक जखमी झाले. यापैकी एकाची प्रकृती गंभीर आहे. मंगळवारी रात्री आकराच्या सुमारास कोल्हापूर- हुपरी मार्गावरील पट्टणकोडोलीनजीक हा अपघात झाला. जखमींवर कोल्हापुरातील तीन वेगवेगळे खासगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत. 
 
हुपरीतील सव्वाशे भाविक चार आरामबसमधून मंगळवारी सकाळी  कुंडल येथे धार्मिक कार्यक्रमासाठी गेले होते. कार्यक्रम संपवून तीन आरामबस गावात परतल्या होत्या. शेवटची बस रात्री आकराच्या सुमारास पट्टणकोडोली गावापासून काही अंतरावर आल्यानंतर वळणावर चालक रमेश कट्टी याचा  ताबा सुटला व अपघात झाला. बस तीन पलटी खाऊन रस्त्यापासून तीस फूट अंतरावर जावून थांबली. 
 
जखमींची नावे अशी : जयश्री सुनील गाट (वय 35), सुलभा रमेश बारगे (51), शिला रमेश उपाध्ये (45), ज्योती रुपकचंद जैन (55), अर्चना चंद्रशेखर कोरडे (48), सुवार्ता किशोर लोणकर (50), रमेश तातोबा उपाध्ये (55), संगीता गोपाळ बच्चे (29), श्रेया सुनील गाट (10) बाळासो धर्मगोंडा पाटील, शैलजा अशोक फांडे, पद्मजा महावीर रणदिवे, संजय नाकील, अर्चना ऐनापुरे, वनिता अभय नाकील, दयानंद नाकील, माई पाटील, उल्का रमेश नाकील, प्रियंका लोणकर, पार्वती नाकील, शेवंती बल्लोळे, वैशाली नाकील, रमेश नाकील, सुशिला शिराळकर, विजयमाला नाकील, वनिता पाटील, महावीर लक्ष्मण रणदिवे, शैलजा नवाळे, सुकुमार ऐनापुरे, अनिकेत पाटील, पुष्पा प्रकाश नाकील, सारिका सुभाष पळसे, राजश्री कोरडे, शोभा कडगावे, बबन कडगावे, नरेंद्र कोरडे, समेद पाटील (सर्व रा. हुपरी)

Web Title: 41 people injured after bus reversed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.