शिवशाही बसची रिक्षाला धडक, ठाणे येथील तिघेजण जागीच ठार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2024 02:06 PM2024-04-08T14:06:27+5:302024-04-08T14:07:29+5:30

दापाेली : ठाणे - दापाेली शिवशाही बसने रिक्षाला पाठीमागून दिलेल्या धडकेत रिक्षातील तिघांचा जागीच मृत्यू झाला. हा भीषण अपघात ...

Shivshahi bus collided with a rickshaw, three people from Thane were killed on the spot | शिवशाही बसची रिक्षाला धडक, ठाणे येथील तिघेजण जागीच ठार

शिवशाही बसची रिक्षाला धडक, ठाणे येथील तिघेजण जागीच ठार

दापाेली : ठाणे - दापाेली शिवशाही बसने रिक्षाला पाठीमागून दिलेल्या धडकेत रिक्षातील तिघांचा जागीच मृत्यू झाला. हा भीषण अपघात मुंबई-गाेवा महामार्गावरील माणगाव (जि. रायगड) येथील मानस हाॅटेलसमाेर रविवारी सकाळी ११:३० वाजण्याच्या दरम्यान झाला. या अपघातातील मृत्युमुखी पडलेले तिघेही ठाणे येथील रहिवासी आहेत. दत्तात्रय वरंदेकर, प्रवीण मालुसरे व गणेश बाबू जाधव (सर्व रा. ठाणे) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.

ठाणे-दापाेली ही शिवशाही बस (एमएच ०९, एफएल ०२४६) ठाणेवरून दापाेलीकडे येत हाेती. ही गाडी महामार्गावरील रायगड जिल्ह्यातील माणगाव शहरातील मानस हाॅटेलजवळ आली असता समाेरून जाणाऱ्या रिक्षाला (एमएच ०४, एफसी ६२८२) पाठीमागून धडक दिली. ही धडक इतकी जबरदस्त हाेती की, शिवशाही बससह रिक्षा रस्त्याच्या बाजूला फेकली गेली. या अपघातात रिक्षाचा चक्काचूर झाला तर बस बाजूच्या कठड्यावर गेली हाेती.

घटनेची माहिती मिळताच माणगाव पोलिस स्थानकाचे पोलिस हवालदार गणेश समेळ व सानप घटनास्थळी तातडीने दाखल झाले. तसेच एस.टी. महामंडळाचे अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले हाेते. अपघातातील मृतांना माणगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी सुरक्षा रक्षक विवेक नितनवरे, नागेश दीपके यांनी सहकार्य केले. या अपघाताचा पंचनामा माणगाव पाेलिसांनी केला असून, पुढील तपास पोलिस करत आहेत.

Web Title: Shivshahi bus collided with a rickshaw, three people from Thane were killed on the spot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.