राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत सिंधुदुर्ग- रत्नागिरी केंद्रांतून 'निर्वासित' प्रथम

By अरुण आडिवरेकर | Published: December 14, 2022 10:10 PM2022-12-14T22:10:42+5:302022-12-14T22:11:11+5:30

६१ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत सिंधुदुर्ग- रत्नागिरी केंद्रातून युथ फोरम, देवगड या संस्थेच्या 'निर्वासित' या नाटकाने प्रथम क्रमांक पटकावला.

nirvasit from sindhudurg ratnagiri center stands first in state marathi drama competition | राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत सिंधुदुर्ग- रत्नागिरी केंद्रांतून 'निर्वासित' प्रथम

राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत सिंधुदुर्ग- रत्नागिरी केंद्रांतून 'निर्वासित' प्रथम

Next

लोकमत न्यूज नेटवर्क 

रत्नागिरी: ६१ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत सिंधुदुर्ग- रत्नागिरी केंद्रातून युथ फोरम, देवगड या संस्थेच्या 'निर्वासित' या नाटकाने प्रथम क्रमांक पटकावला. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, मालवण या संस्थेच्या 'बझर' या नाटकाने द्वितीय तर स्वराध्य फाउंडेशन, मालवण या संस्थेच्या 'श्याम तुझी आवस इली रे' या नाटकाने तृतीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. सांस्कृतिक कार्य संचनालयाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे हा निकाल जाहीर केला. या तीन नाटकांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली आहे. 

सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित या स्पर्धेतील प्राथमिक फेरीचे सिंधुदुर्ग- रत्नागिरी केंद्रावरील अन्य निकाल : दिग्दर्शन- प्रथम पारितोषिक - स्वप्नील जाधव (नाटक- निर्वासित), द्वितीय- (नाटक- बझर), प्रकाश योजना - प्रथम पारितोषिक - श्याम चव्हाण (नाटक- निर्वासित), द्वितीय‌ - श्याम चव्हाण (नाटक- बझर), नेपथ्य - प्रथम - अभय वालावलकर (नाटक- बत्ताशी), द्वितीय - सचिन गावकर (नाटक-निर्वासित) रंगभूषा- प्रथम पारितोषिक- साबाजी पराडकर (नाटक - संकासूरा रे महावीरा), द्वितीय - आदिती दळवी (नाटक- बत्ताशी १९४७). उत्कृष्ट अभिनय रौप्यपदक : - प्रफुल्ल घाग (नाटक- निर्वासित), शुभदा टिकम (नाटक- बझर). अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्र :  प्राजक्ता वाड्ये (नाटक- भिंती), योगिता सावंत (नाटक- श्याम तुझी आवस ईली रे), कीर्ती चव्हाण (नाटक- या व्याकुळ संध्या समयी), भाग्यश्री पाणे (नाटक- ए आपण चहा घ्यायचा का?), सीमा मराठे (नाटक- ऋणानुबंध), योगेश जळवी (नाटक- मधुमाया), प्रसाद करंगुटकर (खरं सांगायचं तर), प्रसाद खानोलकर (नाटक- पासर पीन), कृष्णकांत साळवी (नाटक- मावळतीचा इंद्रधनु), दीपक माणगांवकर (नाटक- मडवीक). 

दि. १५ नोव्हेंबर २०२२ ते दि. १२ डिसेंबर २०२२ या कालावधीत मालवण येथील मामा वरेरकर नाट्यगृह व रत्नागिरीतील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर नाट्यगृह येथे झालेल्या या स्पर्धेत एकूण २५ नाट्यप्रयोग सादर करण्यात आले. स्पर्धेसाठी परीक्षक  म्हणून सतीश शेंडे, मानसी राणे, ईश्वर जगताप यांनी काम पाहिले. सर्व पारितोषिक विजेत्यांचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अभिनंदन केले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: nirvasit from sindhudurg ratnagiri center stands first in state marathi drama competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.