मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात, मनसेच्या मुंबई उपशाखाप्रमुखाचा मृत्यू; राज ठाकरेंच्या सभेला येताना घडली दुर्घटना

By अरुण आडिवरेकर | Published: May 6, 2023 01:53 PM2023-05-06T13:53:18+5:302023-05-06T13:54:56+5:30

तर पाच जण जखमी झाले

MNS Mumbai sub branch chief dies in accident on Mumbai-Goa highway; The accident happened while coming to Raj Thackeray's meeting | मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात, मनसेच्या मुंबई उपशाखाप्रमुखाचा मृत्यू; राज ठाकरेंच्या सभेला येताना घडली दुर्घटना

मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात, मनसेच्या मुंबई उपशाखाप्रमुखाचा मृत्यू; राज ठाकरेंच्या सभेला येताना घडली दुर्घटना

googlenewsNext

रत्नागिरी : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या रत्नागिरीत हाेणाऱ्या सभेला येणाऱ्या  मनसेसैनिकांच्या गाडीला मुंबई-गाेवा महामार्गावरील तुरळ (ता. संगमेश्वर) येथे आज सकाळी अपघात झाला. या अपघातात मुंबईतील मनसेचे उपशाखाप्रमुख देवेंद्र जगन्नाथ साळवी यांचा मृत्यू झाला. तर पाच जण जखमी झाले आहेत.

रत्नागिरी येथे  आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची जाहीर सभा आयाेजित करण्यात आली आहे. या सभेला रत्नागिरी जिल्ह्यासह मुंबई, ठाणे, रायगडसह राज्यातील विविध भागातून कार्यकर्ते माेठ्या संख्येने रत्नागिरीत दाखल हाेत आहेत. या सभेसाठी मुंबईहून देवेंद्र जगन्नाथ साळवी (४१) आपल्या ५ सहकाऱ्यांसह इनाेव्हा कार (एमएच ४३, व्ही ९२०१) घेऊन रत्नागिरीकडे येत हाेते. महामार्गावरील तुरळ येथील सद्गुरू सेवा केंद्राजवळ गाडी आली असता कारवरील चालकाचा ताबा सुटला आणि गाडीला अपघात झाला.

या अपघातात जखमी झालेल्या देवेंद्र साळवी यांना रुग्णालयात नेत असतानाच वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. तर गाडीतील सहप्रवासी किरकाेळ जखमी झाले असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

देवेंद्र साळवी हे मुंबईतील मनसेचे सक्रिय कार्यकर्ते होते. उपशाखाप्रमुख म्हणून ते जबाबदारी सांभाळत हाेते. त्यांच्या निधनाची बातमी समजताच मनसे नेते नितीन सरदेसाई, बाळा नांदगावकर आदींनी रुग्णालयात धाव घेतली. या निधनामुळे मनसेसैनिकात शोककळा पसरली आहे. या अपघाताची माहिती मिळताच संगमेश्वर पाेलिस स्थानकातील पाेलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.

Web Title: MNS Mumbai sub branch chief dies in accident on Mumbai-Goa highway; The accident happened while coming to Raj Thackeray's meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.