‘कनेक्टिव्हिटी’ने गुहागर पर्यटनाच्या प्रवाहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2019 12:37 AM2019-05-01T00:37:54+5:302019-05-01T00:37:59+5:30

संकेत गोयथळे । लोकमत न्यूज नेटवर्क गुहागर : १५ वर्षांपूर्वी झालेला राई-भातगाव पूल व धोपावे फेरीबोट सेवा गुहागरच्या पर्यटन ...

'Connectivity' in the stream of Guhagar tourism | ‘कनेक्टिव्हिटी’ने गुहागर पर्यटनाच्या प्रवाहात

‘कनेक्टिव्हिटी’ने गुहागर पर्यटनाच्या प्रवाहात

googlenewsNext

संकेत गोयथळे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गुहागर : १५ वर्षांपूर्वी झालेला राई-भातगाव पूल व धोपावे फेरीबोट सेवा गुहागरच्या पर्यटन वाढीचा टर्निंग पॉर्इंट ठरला होता. यापुढील काळात होणारे मुंबई-गोवा चौपदरीकरण व गुहागर-विजापूर महामार्ग हे पुन्हा एकदा गुहागर पर्यटनवाढीसाठी टर्निंग पॉर्इंट ठरणार आहेत. तालुक्याची ‘कनेक्टिव्हिटी’ वाढल्याने गुहागरातही पर्यटन प्रवाहात आले आहे.
१५ वर्षांपूर्वीचा विचार करता गुहागरमध्ये फक्त हेदवी, वेळणेश्वर, व्याडेश्वरसाठी येणारा भाविक पर्यटकच येत होता. गुहागरला यायचे झाल्यास तसेच चिपळूणहून अन्यत्र कुठे जायचे झाल्यास पुन्हा चिपळूणला मागे फिरुन जावे लागत असे. यामुळे गुहागरला येणाऱ्या पर्यटकांची संख्या मोजकी होती. मात्र, पंधरा वर्षांपूर्वी झालेला राई-भातगाव पूल व धोपावे फेरीबोट सेवेमुळे रत्नागिरी व दापोली असे दोन तालुके जोडले गेले. येथूनच खºया अर्थाने गुहागरचे पर्यटन वाढू लागले. दापोली तालुका मुंबई, पुणेहून येण्यासाठी जवळचा आहे. यामुळे दापोलीत यापूर्वीच पर्यटनाची सुरुवात झाली, तर गणपतीपुळे हे अनेक वर्षांपासून सर्वांनाच परिचित होते. पर्यटनतज्ज्ञांच्या मतानुसार पर्यटनदृष्ट्या गुहागरपेक्षा दापोली दहा वर्षांनी, तर गणपतीपुळे पन्नास वर्षांनी पुढे आहे. गुहागरशी या तालुक्यांची कनेक्टिव्हिटी वाढल्याने या दोन तालुक्यांबरोबरच गुहागरही पर्यटन प्रवाहात झाले.
गुहागर शहराचा विचार करता वारंवार गुहागर नाक्यात होणारी वाहतूक कोंडी गुहागर शहराच्या पर्यटनवाढीचा मुख्य अडसर बनत आहे. गेली अनेक वर्षे हा विषय वादाचा ठरत आहे. या ठिकाणी शासकीय जागेत असलेली बांधकामे अधिकृत की अनधिकृत यावर शासन कारवाई का करत नाही, असा सवाल ग्रामस्थांतून नेहमी केला जात आहे. या ठिकाणी वाहतूक कोंडी होऊन अनेकवेळा स्थानिक ग्रामस्थ व वाहनचालक याच्यात शाब्दिक वादापासून हाणामारीपर्यंतची वेळ आली आहे.
नव्याने गुहागर - विजापूर महामार्गासाठी रस्ता मोजणीचे काम गेली काही महिने सुरु आहे. या रस्त्याचा झिरो पॉर्इंट गुहागर नाक्यातून सुरु होतो. यावेळी सुरु होणारे काम गुहागर नाक्यातून सुरु व्हावे, अशी गुहागरातील ग्रामस्थांची आग्रही मागणी आहे.
गुहागरनंतर पालशेत बाजारपेठेतील अरुंद रस्त्यामुळे अनेकवेळा वाहतूक कोंडी होते. बारभाईमार्गे बायपास रस्ता करुनही वाहतूक कोंडी टळली जाऊ शकते. यासाठी गुहागर सार्वजनिक बांधकाम खात्याकडून मंत्रालयात पाठवलेला प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे.

Web Title: 'Connectivity' in the stream of Guhagar tourism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.