कोकण कोस्टल मॅरेथॉनला सर्वतोपरी सहकार्य : उदय सामंत

By शोभना कांबळे | Published: December 14, 2023 04:43 PM2023-12-14T16:43:21+5:302023-12-14T16:44:35+5:30

रत्नागिरी : सुवर्णसूर्य फाउंडेशन व रत्नागिरी सायकलिस्ट क्लब आयोजित कोकण कोस्टल मॅरेथॉनला लागणारे सर्व सहकार्य देऊ, अशी ग्वाही राज्याचे ...

All support to Konkan Coastal Marathon says minister Uday Samant | कोकण कोस्टल मॅरेथॉनला सर्वतोपरी सहकार्य : उदय सामंत

कोकण कोस्टल मॅरेथॉनला सर्वतोपरी सहकार्य : उदय सामंत

रत्नागिरी : सुवर्णसूर्य फाउंडेशन व रत्नागिरी सायकलिस्ट क्लब आयोजित कोकण कोस्टल मॅरेथॉनला लागणारे सर्व सहकार्य देऊ, अशी ग्वाही राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली. तसेच क्रीडाप्रेमी आणि महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष किरण सामंत यांनीही ही स्पर्धा न भूतो न भविष्यती होण्याकरिता सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

सुवर्णसूर्य फाउंडेशनतर्फे ७ जानेवारीला ५, १० आणि २१ किलोमीटरची मॅरेथॉन स्पर्धा होणार आहे. रत्नागिरीला धावनगरी बनवणारी ही स्पर्धा असून, या माध्यमातून रत्नागिरीच्या पर्यटनाला गती मिळणार आहे. या स्पर्धेची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांना देण्यात आली. त्या वेळी त्यांनी जिल्हा प्रशासन, शासन, वाहतूक पोलिस यांच्यासह सर्वांचे सहकार्य देऊया, असे सांगितले. ही स्पर्धा रत्नागिरीच्या शिरपेचात मानाचा तुरा होईल, अशा पद्धतीने नियोजन केले पाहिजे. या स्पर्धेला क्रीडा क्षेत्रातील विविध संघटनाही सहकार्य करतील, असे आश्वासन किरण सामंत यांनी दिले आहे.

ॲथलेटिक्स असोसिएशनच्या मान्यतेने हाफ मॅरेथॉन स्पर्धा होणार आहे. यामध्ये महिला, पुरुष यांचे वयोगटानुसार गट करण्यात आले आहे. यामध्ये आकर्षक बक्षिसे, चषक देऊन विजेत्यांना गौरवण्यात येणार आहे. माळनाका, मारुती मंदिर, नाचणे रोड, काजरघाटी, सोमेश्वर, कोळंबे, फणसोप, भाट्ये या मार्गावर ही स्पर्धा रंगणार आहे. आत्तापर्यंत स्पर्धेसाठी ८०० हून अधिक स्पर्धकांनी भाग घेतला आहे.

Web Title: All support to Konkan Coastal Marathon says minister Uday Samant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.