दापोली-खेड मार्गावर भीषण अपघात, 5 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2018 10:07 AM2018-12-28T10:07:19+5:302018-12-28T10:59:44+5:30

दापोली-खेड मार्गावर शुक्रवारी (28 डिसेंबर) भीषण अपघात झाला आहे. डंपर आणि मॅक्सिमोची धडक झाल्याने हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे.

5 died in road accident in dapoli khed road | दापोली-खेड मार्गावर भीषण अपघात, 5 जणांचा मृत्यू

दापोली-खेड मार्गावर भीषण अपघात, 5 जणांचा मृत्यू

googlenewsNext
ठळक मुद्देदापोली-खेड मार्गावर शुक्रवारी (28 डिसेंबर) भीषण अपघात झाला आहे. डंपर आणि मॅक्झिमोची धडक झाल्याने हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. नारपोली गावाजवळील वळणावर हा अपघात झाला आहे.

रत्नागिरी : दापोली-खेड मार्गावर शुक्रवारी (28 डिसेंबर) भीषण अपघात झाला आहे. डंपर आणि मॅक्झिमोची धडक झाल्याने हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. नारपोली गावाजवळील वळणावर हा अपघात झाला आहे. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

शेलार नामक चालक मॅक्झिमो गाडीतून प्रवासी घेऊन दापोलीकडून खेडकडे येत होता. नारगोली इंद्रधनू बागेजवळ एका गाडीला ओव्हरटेक करताना मॅक्झिमो आणि डंपरची टक्कर झाली. या अपघातात मधुकर गंगाराम कांबळे, जगदिश शांताराम पारदुले, मॅक्झिमो चालक शेलार, महमिदा शेख यांच्यासह अन्य एक महिला असे पाच जण जागीच ठार झाले. मृतांमध्ये 2 महिला आणि 3 पुरुषांचा समावेश आहे. यातील मधुकर कांबळे दापोली नगर पंचायतीचे कर्मचारी आहेत. या अपघातात निलेश पवार आणि संदीप पावसकर हे दोघेजण गंभीर जखमी झाले. त्यांना अधिक उपचारासाठी केईएम, मुंबई येथे हलवण्यात आले आहे.  जखमी निलेश पवार हाही नगर पंचायतीचा कर्मचारी आहे.

Web Title: 5 died in road accident in dapoli khed road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.