तीन वाहनांना अपघात; आठ जण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2018 04:51 AM2018-09-13T04:51:10+5:302018-09-13T04:51:18+5:30

मुंबई-गोवा महामार्गावर लोणेरेनजीक मौजे नवघर हद्दीत बुधवारी पहाटे ५.३० तीन वाहनांत झालेल्या अपघातात आठ जण गंभीर जखमी झाले.

Three vehicles accidents; Eight people injured | तीन वाहनांना अपघात; आठ जण जखमी

तीन वाहनांना अपघात; आठ जण जखमी

googlenewsNext

माणगाव : मुंबई-गोवा महामार्गावर लोणेरेनजीक मौजे नवघर हद्दीत बुधवारी पहाटे ५.३० तीन वाहनांत झालेल्या अपघातात आठ जण गंभीर जखमी झाले.
एसटी चालक आनंद कराडे (रा. सोलापूर) आपल्या ताब्यातील परळ-गणपतीपुळे बस घेऊन जात होता. बस नवघर येथे थांबली. तिच्या मागे महिंद्रा जीप उभी होती. जीपला मागून येणाऱ्या एचपी गॅस टँकरने जोरदार धडक दिली. त्यामुळे जीप एसटीवर आदळली. या अपघातात शुभांगी डिंगपाकर (वय ४५), दीपेश डिंगपाकर (वय २०), सदाशिव डिंगपाकर (वय ५५), नीलेश डिंगपाकर (वय १९, सर्व रा. पाचेरी सडा, गुहागर), अक्षय पागडे (वय ३०, रा. आंबेली), अमोल वाघे (वय ३५), अमित वाघे (वय २८), नीताली वाघे (वय २४, सर्व रा. कणकवली) हे जखमी झाले.

Web Title: Three vehicles accidents; Eight people injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात