Video - पार्थ पवार यांची उमेदवारी अद्याप निश्चित नाही - अजित पवार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2019 01:03 PM2019-03-13T13:03:00+5:302019-03-13T14:53:41+5:30

पार्थ पवार यांची उमेदवारी अद्याप निश्चित नाही. अंतिम यादी जाहीर झाल्यावर पार्थचे नाव जाहीर होईल असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे. 

Parth Pawar candidature is not yet decided - Ajit Pawar | Video - पार्थ पवार यांची उमेदवारी अद्याप निश्चित नाही - अजित पवार

Video - पार्थ पवार यांची उमेदवारी अद्याप निश्चित नाही - अजित पवार

googlenewsNext
ठळक मुद्देपार्थ पवार यांची उमेदवारी अद्याप निश्चित नाही. अंतिम यादी जाहीर झाल्यावर पार्थचे नाव जाहीर होईल असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. पार्थच्या प्रचारासाठी पनवेलमध्ये आलेलो नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या 48 जागा निवडून याव्या यासाठी आलो आहे असं अजित पवार यांनी म्हटलं.पनवेलमध्ये कार्यकर्त्यांसोबत झालेल्या बैठकीत काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना पवार यांनी मार्गदर्शन केले.

पनवेल - माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांची मावळमधून लोकसभा निवडणुकीची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात असतानाच अजित पवारांनी त्या मुद्द्यावर सूचक विधान केलं आहे. अजित पवार यांनी बुधवारी (13 मार्च) मावळ लोकसभा मतदार संघाच्या प्रचारासाठी पनवेलमध्ये हजेरी लावली. पार्थ पवार यांची उमेदवारी अद्याप निश्चित नाही. अंतिम यादी जाहीर झाल्यावर पार्थचे नाव जाहीर होईल असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. 

पार्थच्या प्रचारासाठी पनवेलमध्ये आलेलो नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या 48 जागा निवडून याव्या यासाठी आलो आहे असं अजित पवार यांनी म्हटलं. तसेच 'जास्तीत जास्त समविचारी लोकांना एकत्र घेऊन जाण्याचा आमचा प्रयत्न आहे. आतापर्यंत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेतकरी कामगार पक्ष हे तीन पक्ष शंभर टक्के एकत्रितपणे निवडणुकीला सामोरे जातात हे सत्य आहे. आता बाकीच्या बद्दलची चर्चा सुरू असून एक-दोन दिवसांत हे चित्र स्पष्ट होईल' असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. 

पनवेलमध्ये कार्यकर्त्यांसोबत झालेल्या बैठकीत काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना अजित पवार यांनी मार्गदर्शन केले. भाजपा सरकारचे अपयश जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी नोटाबंदी, शेतकरी  कर्जमाफी, महागाई हे विषय लावून धरण्यास सांगितले. तसेच राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय विखे पाटील यांना काँग्रेस न सोडण्याचा सल्ला दिला होता असंही अजित पवार म्हणाले आहेत. मागील आठवडाभरापासून पार्थ पवार हे पनवेल, उरण मतदारसंघात शेकाप, काँग्रेस, राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेत आहेत.

नातवासाठी आजोबांची माघार, मावळमधून लढणार पार्थ पवार

अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार हे मावळ मतदारसंघातून निवडणूक लढवणार अशी चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होती. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पार्थ पवार यांच्या उमेदवारीबाबत मोठी घोषणा केली. पार्थ पवार यांना मावळमधून उमेदवारी देण्यात यावी, अशी सर्वांची इच्छा आहे. या मतदार संघात प्राबल्य असलेल्या शेतकरी कामगार पक्षानेही तशी मागणी केली आहे. त्यामुळे त्यांना उमेदवारी देण्याचा विचार सुरू असल्याचे संकेत शरद पवार यांनी दिले.

पुण्यात आयोजित करण्यात पत्रकार परिषदेत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना शरद पवार यांनी पार्थ पवार यांच्या उमेदवारीबाबत भाष्य केले. पार्थ पवार यांनी मावळमधून निवडणूक लढवावी, अशी मावळमधील कार्यकर्त्यांची इच्छा आहे. मावळ मतदारसंघातील काही भागात शेतकरी कामगार पक्षाचे वर्चस्व आहे. त्यांनीही पार्थ पवार यांना उमेदवारी द्यावी, अशी मागणी केली आहे. त्या पार्श्वभूमीवर आम्ही कुटुंबामध्ये चर्चा केली. तसेच एका कुटुंबातून किती जणांनी निवडणूक लढवावी, असा प्रश्न त्यावेळी उपस्थित झाला. त्यावेळी कुटुंबीयांशी चर्चा करून नव्या पिढीला संधी देण्याचा निर्णय मी घेतला आहे. त्यामुळे बारामती येथून सुप्रिया सुळे या निवडणूक लढवतील. तसेच मावळमधून पार्थ पवार यांना संधी देण्याबाबत निर्णय घेण्यात येईल असे शरद पवार यांनी सांगितले आहे.

Web Title: Parth Pawar candidature is not yet decided - Ajit Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.