नातवासाठी आजोबांची माघार, मावळमधून लढणार पार्थ पवार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2019 03:20 PM2019-03-11T15:20:47+5:302019-03-11T15:36:47+5:30

अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार हे मावळ मतदारसंघातून निवडणूक लढवणार अशी चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होती. अखेर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पार्थ पवार यांच्या उमेदवारीबाबत मोठी घोषणा केली आहे.

Parath Pawar will Contest Election from Maval | नातवासाठी आजोबांची माघार, मावळमधून लढणार पार्थ पवार

नातवासाठी आजोबांची माघार, मावळमधून लढणार पार्थ पवार

Next

पुणे -  अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार हे मावळ मतदारसंघातून निवडणूक लढवणार अशी चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होती. अखेर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पार्थ पवार यांच्या उमेदवारीबाबत मोठी घोषणा केली आहे. पार्थ पवार यांना मावळमधून उमेदवारी देण्यात यावी, अशी सर्वांची इच्छा आहे. या मतदार संघात प्राबल्य असलेल्या शेतकरी कामगार पक्षानेही तशी मागणी केली आहे. त्यामुळे त्यांना उमेदवारी देण्याचा विचार सुरू असल्याचे संकेत शरद पवार यांनी दिले.

आज पुण्यात आयोजित करण्यात पत्रकार परिषदेत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना शरद पवार यांनी पार्थ पवार यांच्या उमेदवारीबाबत भाष्य केले. ''पार्थ पवार यांनी मावळमधून निवडणूक लढवावी, अशी मावळमधील कार्यकर्त्यांची  इच्छा आहे. मावळ मतदारसंघातील काही भागात शेतकरी कामगार पक्षाचे वर्चस्व आहे. त्यांनीही पार्थ पवार यांना उमेदवारी द्यावी, अशी मागअी केली आहे. त्या पार्श्वभूमीवर आम्ही कुटुंबामध्ये चर्चा केली. तसेच एका कुटुंबातून किती जणांनी निवडणूक लढवावी, असा प्रश्न त्यावेळी उपस्थित झाला. त्यावेळी कुटुंबीयांशी चर्चा करून नव्या पिढीला संधी देण्याचा निर्णय मी घेतला आहे. त्यामुळे बारामती येथून सुप्रिया सुळे या निवडणूक लढवतील. तसेच मावळमधून पार्थ पवार यांना संधी देण्याबाबत निर्णय घेण्यात येईल. असे पवार यांनी सांगितले. 



 

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने लोकसभेची उमेदवारी दिल्यास मावळ लोकसभा मतदार संघातील निवडणूक लढविणार, असे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी म्हटले होते. 

Web Title: Parath Pawar will Contest Election from Maval

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.