पुण्यातील महर्षीनगरमध्ये मध्यरात्री दोन गटात हाणामारी; स्वारगेट पोलिसांत फिर्याद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2017 12:51 PM2017-12-08T12:51:30+5:302017-12-08T12:52:26+5:30

स्वारगेटजवळील पुजारी गार्डन परिसरात टोळक्याने रात्री धुडकूस घातला असून जुन्या वादातून हा प्रकार घडला असल्याचे समजते. परस्पर विरोधी फिर्याद स्वारगेट पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे.

Two groups clash in Maharshi Nagar, pune in midnight; Swargate police action | पुण्यातील महर्षीनगरमध्ये मध्यरात्री दोन गटात हाणामारी; स्वारगेट पोलिसांत फिर्याद

पुण्यातील महर्षीनगरमध्ये मध्यरात्री दोन गटात हाणामारी; स्वारगेट पोलिसांत फिर्याद

googlenewsNext
ठळक मुद्दे पुजारी गार्डन परिसरात टोळक्याने रात्री घातला धुडकूसस्वारगेट पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी फिर्याद

महर्षी नगर : स्वारगेटजवळील पुजारी गार्डन परिसरात टोळक्याने रात्री धुडकूस घातला असून जुन्या वादातून हा प्रकार घडला असल्याचे समजते.

महर्षीनगर मध्ये दोन गटांमध्ये मारामारी रात्री साडेबाराच्या सुमारास पुजारी गार्डनमध्ये सराईत गुन्हेगार सचिन माने व त्याच्या दोन साथीदारांसह थांबलेला असताना बाबू शेकापूरे, संतोष, भीमा मनपाडे हे लघुशंकेसाठी गेलेले असताना त्यांच्यात शिवीगाळ होऊन भांडणे झाली. त्यावेळी बाहेर सचिन कांबळे याच्या वाढदिवसाच्या निमित्त मुले जमलेली होती. भीमा मनपाडे याने त्यांना बोलवून माने व त्याच्या साथीदारांना मारहाण केली. त्यावेळी माने सोबत सराईत गुन्हेगार टिक्या शेलार होता. त्याची नुकतीच जामीनावर सुटका झालेली आहे. भीमा मनपाडे व टिक्या शेलारच्या गटांत मारामारी झाली.
दरम्यान परस्पर विरोधी फिर्याद स्वारगेट पोलीस ठाण्यात देण्यात आली असून पोलीस उपनिरीक्षक उसगावकर तपास करीत आहेत.

Web Title: Two groups clash in Maharshi Nagar, pune in midnight; Swargate police action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.