फ्लेक्स फाडला; गणेश पेठेत किरकोळ भांडणातून थेट खून, दोघांना अटक

By नम्रता फडणीस | Published: November 21, 2023 07:50 PM2023-11-21T19:50:36+5:302023-11-21T19:50:43+5:30

कोजागिरी पौर्णिमेचा फ्लेक्स फाडल्यामुळे झालेल्या भांडणातून खून केल्याचे पोलीस तपासात समोर

Torn flakes Direct murder due to petty quarrel in Ganesh Peth two arrested | फ्लेक्स फाडला; गणेश पेठेत किरकोळ भांडणातून थेट खून, दोघांना अटक

फ्लेक्स फाडला; गणेश पेठेत किरकोळ भांडणातून थेट खून, दोघांना अटक

पुणे : फ्लेक्स फाडल्यामुळे झालेल्या भांडणातून गणेश पेठेत तरुणावर कोयत्याने वार करून खून केला. पाेलिस तपासात ही धक्कादायक बाब समोर आली आहे. गुन्हे शाखेने या प्रकरणी तुषार राजू कुंदूर (वय २१), आशुतोष संतोष वर्तले (वय २०, दोघेही रा. गणेशपेठ) या दोघांना अटक केली आहे.

सिध्दार्थ नंदकुमार हादगे (वय २९, रा. गणेशपेठ) असे खून झालेल्याचे नाव आहे. अधिक माहितीनुसार, सिद्धार्थ हादगे आणि सुमित चव्हाण रविवारी मध्यरात्री गप्पा मारत थांबले होते. त्यावेळी तुषार कुंदूर, अशिष कुंदूर, हर्षल पवार यांच्यासह साथीदारांनी वैमनस्यातून हादगे याचा पाठलाग करून त्याच्यावर कोयत्याने वार केले. उपचारापूर्वीच सिद्धार्थ याचा मृत्यू झाला.

गुन्हे शाखेच्या युनिट एककडून तपास करण्यात येत होता. आरोपी कुंदूर कोथरूड भागात थांबल्याची माहिती पोलिस हवालदार अजय थोरात आणि अनिकेत बाबर यांना मिळाली. पोलिसांच्या पथकाने सापळा लावून त्यांना ताब्यात घेतले. आरोपींची चौकशी केली. दोन वर्षांपूर्वी सिध्दार्थने भांडणातून तुषार कुंदूर आणि त्याचा भाऊ आशिष कुंदूर यांच्यावर शस्त्राने वार केले होते. त्यानंतर हादगे तुषार आणि त्याच्या भावाला शिवीगाळ करत होता.

गेल्या महिन्यात २४ ऑक्टोबर रोजी कोजागरी पाैर्णिमेचा कार्यक्रम आयोजित केला होता. फ्लेक्स फाडल्यामुळे त्यांच्यात पुन्हा भांडणे झाली होती. रागातून आरोपींनी हादगेचा खून केल्याची कबुली दिली. पोलिस उपायुक्त अमोल झेंडे, सहायक आयुक्त सुनील तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक शब्बीर सय्यद, उपनिरीक्षक रमेश तापकीर, अजय थोरात, अनिकेत बाबर, महेश बामगुडे, लेश साबळे, दत्ता सोनवणे आदींनी ही कामगिरी केली.

Web Title: Torn flakes Direct murder due to petty quarrel in Ganesh Peth two arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.