पत्नी अन् सासरच्या लोकांनी जबरदस्तीने तरुणाला पाजले विष; उपचारादरम्यान मृत्यू

By नितीश गोवंडे | Published: January 10, 2024 04:56 PM2024-01-10T16:56:03+5:302024-01-10T16:56:47+5:30

तरुणाच्या वडिलांना आराेपींनी फाेन करुन, विष प्राशन केले असून त्याची परिस्थिती गंभीर असल्याचे सांगितले

The wife and in-laws forcefully poisoned the young man; Death during treatment | पत्नी अन् सासरच्या लोकांनी जबरदस्तीने तरुणाला पाजले विष; उपचारादरम्यान मृत्यू

पत्नी अन् सासरच्या लोकांनी जबरदस्तीने तरुणाला पाजले विष; उपचारादरम्यान मृत्यू

पुणे : एका १९ वर्षीय तरुणाला त्याच्या पत्नीसह सासरच्या व्यक्तींनी जबरदस्तीने विष प्राशन करायला लावले. त्यामुळे तरुणाची परिस्थिती गंभीर झाल्याने त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले हाेते. परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे चतु:श्रृंगी पोलिसांनी पत्नीसह सासरच्या चौघांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. असिब मंडल (१९, मु. रा.पश्चिम बंगाल) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर याप्रकरणी लुत्फर रहमान मंडल सोलेमान मंडल (पश्चिम बंगाल) यांनी फिर्याद दिली आहे.

याप्रकरणी पोलिसांनी आराेपीची १८ वर्षीय पत्नी राही बीबी, साडु बच्चु मिया (२७), मेव्हणा माेनीरूल मिया (२५), जुहरी बीबी आणि सासरा साबिरुल मिया (सर्व मुळ रा. बक्सा, पाे.बिराेही, हरिघाटा, जि. नादिया) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत असिब मंडल याला त्याचा मेव्हणा माेनीरुल मिया व साडु बच्चु मिया यांनी फाेन करुन पुण्यातील बालेवाडी परिसरातील विठ्ठल मंदिराजवळ तिसरा मजल्यावरील घरी बाेलवले. त्यानंतर त्याच्या वडिलांना आराेपींनी फाेन करुन, असिब याने विष प्राशन केले असून त्याची परिस्थिती गंभीर आहे. त्याला हाॅस्पिटल मध्ये दाखल केले आहे, तरी तुम्ही एक लाख रुपये घेऊन या असे सांगितले.

त्यानुसार तक्रारदार हे ससून रुग्णालयात त्यांच्या मुलाला बघण्यासाठी आले असता, तेथील डाॅक्टरांनी उपचार सुरु असताना मुलास मृत घाेषित केले. त्यामुळे आराेपींनी यांनी तक्रारदार मंडल यांच्या मुलाला कट करुन जबरदस्तीने विष प्राशन करायला लावल्याने त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार २४ ऑक्टोबर २०२३ रोजी मध्यरात्री अडीच ते तीनच्या सुमारास बालेवाडी परिसरात घडला. याप्रकरणी अशाेकनगर पोलिस स्टेशन, जि.बारसत उत्तर २४ परगाना,पश्चिम बंगाल येथे दिलेल्या तक्रारीवरुन शून्य ने दाखल होऊन चतु:श्रृंगी पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक केंद्रे करत आहेत.

Web Title: The wife and in-laws forcefully poisoned the young man; Death during treatment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.