मिठाईच्या दुकानात टँकर घुसला; तरुणी ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2017 01:04 AM2017-12-30T01:04:39+5:302017-12-30T01:04:49+5:30

पुणे/धायरी : वडगाव धायरी येथील नवले पुलाखाली कात्रजहून येणाºया सिमेंट टँकरचे ब्रेक निकामी झाल्याने भीषण अपघात झाला.

A tanker enters a sweet shop; Killer killed | मिठाईच्या दुकानात टँकर घुसला; तरुणी ठार

मिठाईच्या दुकानात टँकर घुसला; तरुणी ठार

googlenewsNext

पुणे/धायरी : वडगाव धायरी येथील नवले पुलाखाली कात्रजहून येणा-या सिमेंट टँकरचे ब्रेक निकामी झाल्याने भीषण अपघात झाला. हा टँकर सरळ विश्व आर्केड इमारतीमधल्या सिरवी मिठाईवाले या दुकानात घुसल्याने टँकरच्या चाकाखाली येऊन तरुणीचा मृत्यू झाला, तर दोघे जण जखमी झाले. दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. टँकरचालकाला सिंहगड पोलिसांनी अटक केली आहे. अपघाताची बातमी कळताच अग्निशामक दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी पोहोचल्या.
स्वाती मधुकर ओरके (वय २९, रा. कर्वेनगर, मूळ पुलगाव वर्धा) असे ठार झालेल्या युवतीचे नाव आहे. ती संगणक अभियंता होती, तर संदीप पाटील (वय ३०, वाल्हेकर कॉलनी, नºहे) आणि सुनील बाळासाहेब साळुंखे (वय ४१, भूमकरनगर, रा. नºहे) अशी जखमींची नावे आहेत. प्रमोद मारुती कणसे (वय ३०, मु. पो. भिगवण स्टेशन, ता. इंदापूर) असे अटक केलेल्या वाहनचालकाचे नाव आहे. दोघांना नवले रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अग्निशामक दलाचे अधिकारी प्रभाकर उम्राटकर, स्टेशन आॅफिसर प्रकाश गोरे, सतीश डाकवे, राजेश वाझे, संदीप पवार, मनोज ओव्हाळ यांनी ही कामगिरी केली.
एक मिक्स सिमेंट घेऊन जाणारा टँकर कात्रजकडून येत होता. नवले पुलाखाली आल्यानंतर भरधाव वेगातील टँकरचे ब्रेक निकामी झाल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि टँकर थेट समोरील विश्व आर्केड कॉम्प्लेक्सच्या इमारतीमध्ये घुसला.
दोन वाहनांना ठोकर मारत आवारातील पाणीपुरी स्टॉलला उडवून तळमजल्यावरील सिरवी मिठाईवाले या दुकानात घुसला. त्या वेळी तेथे स्वाती ओरके व तीचे सहकारी ऊसाचा रस पिण्यासाठी आले होते़ टँकर अंगावर येत असल्याचे पाहताच सहकारी पळाले स्वाती पळताना पडली़ त्यामुळे तिला जीव गमवावा लगला़

Web Title: A tanker enters a sweet shop; Killer killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.