मोटारीने ठोकरले सहा वाहनांना, दोघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2018 03:30 AM2018-01-28T03:30:35+5:302018-01-28T03:30:45+5:30

भरधाव जाणा-या मोटारीवरील नियंत्रण सुटून झालेल्या विचित्र अपघातात एका गॅरेज कामगारासह दोघांचा मृत्यु झाला़ हा अपघात मालधक्का चौकातील डॉ़ बाबासाहेब आंबेडकर भवनाशेजारील रस्त्यावर शनिवारी दुपारी दीडच्या सुमारास घडला.

 Six vehicles hit by motor, both of them died | मोटारीने ठोकरले सहा वाहनांना, दोघांचा मृत्यू

मोटारीने ठोकरले सहा वाहनांना, दोघांचा मृत्यू

Next

पुणे - भरधाव जाणा-या मोटारीवरील नियंत्रण सुटून झालेल्या विचित्र अपघातात एका गॅरेज कामगारासह दोघांचा मृत्यु झाला़ हा अपघात मालधक्का चौकातील डॉ़ बाबासाहेब आंबेडकर भवनाशेजारील रस्त्यावर शनिवारी दुपारी दीडच्या सुमारास घडला़
अरुण शिवाजी गायकवाड (वय ५७, रा. डी.वाय. हॉस्पिटलसमोर, वल्लभनगर, पिंपरी), फ्रँक अलेक्झेंडर डीक (वय ५८, रा.न्यु मोदी खाना, एसआरए बिल्डीग, भवानी पेठ) असे या अपघातात मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी चालक राजेंद्रवसंत लोडगे (वय ४५, रा. नसरापुर) याला अटक केली आहे़
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंबेडकर भवन शेजारी के. ई. एम. रुग्णालयाकडे जाणाºया रस्त्यावर कार पेटींग व दुरूस्तीचे गॅरेज आहे. त्याठिकाणी फ्रँक हा काम करत होता. तर, अरूण गायकवाड हे पिंपरीवरून त्यांची कार दुरूस्तीसाठी घेऊन आले होते. शनिवारी दुपारी दीड वाजण्याच्या फ्रँक हा एका कारचे काम करत होता. तर, गायकवाड हे त्यांच्या कारचे काम सुरु असल्याने तेथे उभारले होते. हे काम गॅरेजसमोर असणाºया रस्त्यावर सुरु होते. त्याठिकाणी आणखी काही कार उभा केलेल्या होत्या. त्याच दरम्यान चालक राजेंद्र लोडगे हा त्याची आई आजारी असल्याने त्यांना घेऊन त्याच्याकडील मोटारीतून घेऊन भरघाव वेगात नेहरु रोडने येऊन ससून रुग्णालयाकडे जात होता. मात्र, त्याचे मोटारीवरील नियंत्रण सुटल्याने त्याने गॅरेजसमोरील वाहनांना उडवत काही अंतरावर गेला. यामध्ये त्यांने चार मोटारी आणि दोन दुचाकींना ठोकले़ तेथे आलेले अरूण गायकवाड हे या भीषण अपघातात दोन मोटारींच्या मध्ये अडकले. तर, फ्रँक यांना जोरात धडक बसल्याने उडून एका मोटारीच्या काचेवर जाऊन पडले़ यात दोघेही गंभीर जखमी झाले. नागरिकांनी तात्काळ पोलिस नियत्रंण कक्षाला माहिती दिली. ही माहिती समर्थ पोलिसांना देण्यात आली. दरम्यानच्या कालावधीत नागरिकांनी जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु, त्यांच्यावर उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला.

Web Title:  Six vehicles hit by motor, both of them died

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.