शिरूर स्मशानभूमीचा परिसर दिव्यांनी उजळला, युवा स्पंदन व युवा वाद्य पथकाच्या युवकांचा सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2017 02:18 AM2017-10-20T02:18:40+5:302017-10-20T02:18:49+5:30

दीपावलीत आंगण, मंदिरे, घरे दीपोत्सवाने उजळून निघतात. मात्र अंतिम संस्काराच्या प्रसंगाव्यतिरिक्त क्वचितच ज्या ठिकाणी कोणी फिरकत नसावे असा स्मशानभूमीचा (अमरधाम) परिसर दिव्यांनी उजळून टाकला.

 Shirur cremated the area, the Youth Spandan and the Youth Spirits team participated | शिरूर स्मशानभूमीचा परिसर दिव्यांनी उजळला, युवा स्पंदन व युवा वाद्य पथकाच्या युवकांचा सहभाग

शिरूर स्मशानभूमीचा परिसर दिव्यांनी उजळला, युवा स्पंदन व युवा वाद्य पथकाच्या युवकांचा सहभाग

Next

शिरूर : दीपावलीत आंगण, मंदिरे, घरे दीपोत्सवाने उजळून निघतात. मात्र अंतिम संस्काराच्या प्रसंगाव्यतिरिक्त क्वचितच ज्या ठिकाणी कोणी फिरकत नसावे असा स्मशानभूमीचा (अमरधाम) परिसर दिव्यांनी उजळून टाकला.
युवा स्पंदन व युवा वाद्य पथकाच्या युवकांनी एक आगळा-वेगला दीपोत्सव साजरा केला. ज्या ठिकाणी रात्री येण्यास लोक घाबरतात त्या ठिकाणी या युवकांनी भीती व अंधश्रद्धा बाजूला ठेवून एक चांगला संदेश समाजाला देण्याचा प्रयत्न केला. लक्ष लक्ष दिव्यांच्या दीपावली सणात दिव्यांचा उत्सव सर्वत्रच पाहायला मिळतो. मात्र प्रत्येक मनुष्याच्या जीवनाचा शेवटचा प्रवास जिथे संपतो त्या स्मशानभूमीत दीपोत्सव साजरा करण्याची कल्पना मनात येणे ही निश्चितच कात्ौुकास्पद गोष्ट म्हणावी लागेल. या भागात रात्रीच काय पण दिवसा येण्यासही कोणास आवडत नाही. यातच भूतप्रेत याबाबत आजही अंधश्रद्धा मनात आहेच. स्मशानभूमीच हा भागही आपल्या जीवनातला महत्त्वाचा भाग आहे. याची जाणीवच करून देण्यासाठी तसेच अंधश्रद्धा दूर करण्याच्या हेतूने युवा स्पंदनच्या युवकांनी मागील वर्षापासून स्मशानभूमीत दीपोत्सव साजरा करण्याचा उपक्रम सुरू केला.
नगराध्यक्षा वैशाली वाखारे, जिल्हा परिषद सदस्य कोमल वाखारे यांच्या हस्ते दीपोत्सवाची सुरुवात करण्यात आली. लोकजागृतीचे संस्थापक रवींद्र धनक, नगरसेवक विठ्ठल पवार, अभिजित पाचर्णे, संदीप गायकवाड, माजी नगरसेवक दादाभाऊ वाखारे, आदिशक्ती महिला मंडळाच्या अध्यक्षा शशिकला काळे, अ‍ॅड. सीमा काशीकर, अनुपमा दोशी, राणी चोरे, तृप्ती लामखडे आदी या वेळी उपस्थित होते. युवा स्पंदनचे प्रमुख धोत्रे, प्रियांका धोत्रे, अजिंक्य महाजन, प्रतिमा काशीकर, मानसी ढवळे, प्रवीण मापारी, कुणाल काळे, सचिन जाधव, प्रतीक काशीकर, यश जैन, पुष्पक नितनवरे, अथर्व वीरशैैव, हृषीकेश कडेकर, प्रतिभा उनवणे, ज्योती डोळस, दिव्या कोठारी, संजय भोस, नाना उजवणे आदी युवा स्पंदनच्या युवक, युवतींनी या दीपोत्सवाचे आयोजन केले.

गंगारामचा वाखारेंच्या हस्ते सत्कार

स्मशानजोगी म्हणून काम करणाºया गंगाराम जाधव याचा यावेळी जि.प. सदस्या कोमल वाखारे यांच्या हस्ते रोख रक्कम व मिठाई देऊन सत्कार केला.
उपस्थित नगरसेवकांनी गंगारामला रोख रक्कम भेट दिली. माझ्या संपूर्ण आयुष्यात प्रथमच स्मशानभूमी दिव्यांनी उजळलेली पाहिल्याची भावुक प्रतिक्रिया या वेळी गंगारामने दिली.

Web Title:  Shirur cremated the area, the Youth Spandan and the Youth Spirits team participated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :diwaliदिवाळी