बापानेच केला सात महिन्याच्या चिमुरडीचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2018 03:43 PM2018-03-03T15:43:08+5:302018-03-03T15:43:08+5:30

आंधळगाव (ता.शिरूर) येथे मुलगी पोटाची नसल्याचे संशय असल्याने बापानेच  सात महिन्याच्या मुलीचा गळा चिरून तिचा खून करून मृतदेह जवळच्या विहिरीत फेकला असल्याची घटना घडली आहे. तर मुलीच्या बापाने मुलीचे अपहरण झाल्याच बनाव केला होता.

The seven-month-old chimera blood | बापानेच केला सात महिन्याच्या चिमुरडीचा खून

बापानेच केला सात महिन्याच्या चिमुरडीचा खून

Next
ठळक मुद्दे पोलिसांच्या तपासात मुलीच्या वडिलांच्या बोलण्यात तफावत आढळली.

रांजणगाव सांडस : आंधळगाव (ता.शिरूर) येथे  स्वतः ची मुलगी नसल्याचा संशय असल्याने बापानेच  सात महिन्याच्या मुलीचा गळा चिरून तिचा खून करून मृतदेह जवळच्या विहिरीत फेकला असल्याची घटना घडली आहे , तर मुलीच्या बापाने मुलीचे अपहरण झाल्याचा  बनाव केला होता.
अवघ्या पाच तासात शिरूरचे पोलीस निरीक्षक राजेंद्र कुंटे व पथकाने या गुन्ह्याचा तपास लावण्यात यश आले आहे.यामुळे याभागात खळबळ उडाली आहे . ही घटना २८ फेब्रुवारी मध्यरात्रीच्या दरम्यान घडली. कौशल्या भुरा  धुलकर ( वय ७ महिने) असे खून झालेल्या मुलीचे नांव आहे. भूरा शंकर धुलकर (वय २८,सध्या   , मूळ रा .विटनेर , जळगाव ) असे मुलीचा खून करणा-या बापाचे नांव आहे. 
याबाबत शिरूरचे पोलिस निरीक्षक राजेंद्र कुंटे यांनी दिलेल्या माहितीनुसार ,  कुरळी -आंधळगाव हद्दीत अनिल बोरकर यांच्या शेतात भूरा धुलकर हा ऊसतोड करीत होता. घटनेच्या दिवशी रात्रीपासून परीसरात त्याची सात महिन्याची मुलीला कौशल्याला  कोणीतरी उचलून नेल्याचा बनाव त्याने केला होता . मुलगी सापडत नसल्याने तो मांडवगण पोलिस स्टेशन येथे मुलगी हरवल्याची फिर्याद देण्यासाठी भूरा व त्याची पत्नी गेली होती. त्याचवेळी पोलीस स्टेशन येथे भुरा राहत असलेल्या ठिकणाजवळ असलेल्या विहिरीत मुलीचा मृतदेह तरंगत असल्याचे माहिती पोलिसांनी मिळाली. मृतदेह बाहेर काढल्यानंतर मुलीचा गळा चिरलेला दिसला असल्याने ही खुनाची घटना असल्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र कुंटे यांना संशय आला. 
त्यामुळे पोलिसांची चक्रे त्यादिशेने फिरली असता मुलीच्या वडिलांच्या बोलण्यात तफावत आढळली. पोलिसांनी मुलीचे वडील भूरा याला पोलीसी खाक्या दाखवतच भुरा धुलकर याने खुनाची कबुली दिली. पहिल्या मुलाच्या जन्मानंतर बायको अरुणा ही बरेच दिवस माहेरी होती. ती पुन्हा नांदायला आली त्यानंतर त्यांना कौशल्या ही मुलगी झाली. परंतु , ही मुलगी आपली नाही असा संशय भुऱ्याला होता. यावरून अरुणाबरोबर त्याची भांडणे होत असत. बुधवारी दुपारी अशीच भांडणे झाली होती. त्या रागात रात्री भुरा याने मुलीला झोपडीतून बाहेर नेले व तिच्या मानेवर धारदार शस्त्राने वार करून तिचा खून केला. यावेळी अरुणा हिने विरोध कण्याचे प्रयत्न केला असता तुलाही मारून टाकेल अस दम दिला व मृतदेह जवळच्या विहिरीत फेकून दिला असल्याची कबुली आरोपी भूरा धुलकर याने दिली. 

Web Title: The seven-month-old chimera blood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.