ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य यांचं निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2018 07:47 PM2018-04-02T19:47:15+5:302018-04-02T19:47:15+5:30

ज्येष्ठ समाजवादी नेते आणि माजी गृहराज्यमंत्री भाई वैद्य यांचं निधन झालं आहे.

Senior Socialist leader Bhai Vaidya passed away | ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य यांचं निधन

ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य यांचं निधन

googlenewsNext

पुणे : ज्येष्ठ समाजवादी नेते आणि माजी गृहराज्यमंत्री भाई वैद्य यांचे सोमवारी निधन झाले.  ते ८९ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती. अखेर त्यांनी आज  शेवटचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात मुलगा अभिजीत वैद्य, सून आणि नातवंडे असा परिवार आहे. 

गेल्या काही दिवसांपूर्वी भाई वैद्य यांना स्वादुपिंडाचा कर्करोग असल्याचे निदान झाले होते. तेव्हापासून त्यांच्यावर येथील पुना हॉस्पिटलमधील अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. मात्र, या उपचारांना त्यांचे शरीर हवा तसा प्रतिसाद देत नसल्याने त्यांची अखेर आज प्राणज्योत मालवली. भाई वैद्य यांची आठ महिन्यांपूर्वी अँजिओप्लास्टी झाली होती. तीन आठवड्यांपूर्वी वैद्य यांना स्वादुपिंडाच्या कर्करोगाचे निदान झाल्यानंतर त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या विकारामुळे त्यांना श्वासोच्छवास घेण्यास त्रास होत होता.

भाई वैद्य यांच्याविषयीची माहिती..
भाई वैद्य यांचा जन्म २२ जून १९२७ रोजी झाला होता. सामाजिक कार्यासाठी त्यांनी आयुष्य वेचले.

खालील पदावर होते कार्यरत...
अध्यक्ष, एस.एम.जोशी मेमोरिअल मेडिकल ट्रस्ट, पुणे  (१९९८पासून)
अध्यक्ष, पुणे म.न.पा.सेवा निवृत्त संघ  (१९९५ पासून)

त्यांनी भूषवलेली पदे... 
राष्ट्रीय अध्यक्ष, सोशलिस्ट पार्टी (इंडिया) ( मे २०११ ते २०१६)
राष्ट्रीय अध्यक्ष, भारत यात्रा ट्रस्ट, दिल्ली. (२००४ ते २०११)
राष्ट्रीय महामंत्री, जनता पार्टी. (१९८६ ते १९८८ )
राष्ट्रीय महामंत्री, समाजवादी जनपरिषद (१९९५ ते १९९९)
राष्ट्रीय अध्यक्ष, राष्ट्र सेवा दल (२००० ते २००२)
महापौर, पुणे (१९७४ ते १९७५)
राष्ट्रीय अध्यक्ष, ऑल इंडिया मेयर्स कॉन्फरन्स (१९७५)
राष्ट्रीय अध्यक्ष, अखिल भारतीय समाजवादी अध्यापक सभा(२००४ ते २०१३)
अध्यक्ष, खडकी अ‍ॅम्युनिशन फॅक्टरी वर्कर्स युनियन,पुणे २०१३ पर्यंत

गृहराज्यमंत्री असताना घेतलेले निर्णय...
महाराष्ट्र राज्याचे गृह आणि सर्वसाधारण प्रशासन या खात्याचे राज्यमंत्री (१९७८ ते १९८०)
या कार्यकाळात पहिले मराठवाडा नामांतर विधेयक विधानसभेत मांडले.
स्मगलरचे सात साथीदार तीन लाख रुपये लाच घेऊन आले असताना गृहराज्य मंत्री म्हणून त्यांना पोलिसांच्या हवाली करून तुरुंगात पाठविले.
महाराष्ट्र राज्य पोलिसांना फुल पॅंट देण्याचा ऐतिहासिक निर्णय.
महाराष्ट्र सेवा निवृतांच्या वेतनामध्ये किमान निवृती वेतन आणि त्याची महागाईशी जोडणी या गोष्टी करून घेतल्या.

अनेक चळवळीमध्ये सक्रिय सहभाग व तुरुंगवास...
१९४२ साली शालेय जीवनात चलेजाव चळवळीमध्ये सहभाग.
१९५५ मध्ये गोवा स्वातंत्र्य चळवळीमध्ये दुसर्‍या तुकडीत सहभाग आणि जबर मारहाण.
१९५७ साली संयुक्त महाराष्ट्र चळवळीत सहभाग व तुरुंगवास.
१९६१ साली कच्छ सत्याग्रहामध्ये भुज ते खावडा पदयात्रेत सहभाग.
१९७४ ते १९७७ या दरम्यान आणीबाणीमध्ये मिसाबंदी म्हणून १९ महीने तुरुंगवास.
१९८३ मध्ये जनता पार्टीचे अध्यक्ष श्री.चंद्रशेखर यांच्या नेतृत्वाखाली कन्याकुमारी ते दिल्ली दरम्यान निघालेल्या भारत यात्रा मध्ये ४००० किलोमीटर अंतराच्या यात्रेत सक्रिय सहभाग.

आतापर्यंत सुमारे २५ वेळा सत्याग्रह व तुरुंगवास...
शेवटचा सत्याग्रह व अटक डिसेंबर २०१६ मध्ये ८८व्या वर्षी शिक्षण हक्कासाठी. १९४३ साली राष्ट्र सेवा दलात सामिल झाल्यापासून ‘लोकशाही समाजवादी’ विचारधारा स्विकारली आणि आजतागायत ती निष्ठेने जपली.

Web Title: Senior Socialist leader Bhai Vaidya passed away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.